शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
5
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
6
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
7
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
8
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
9
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
10
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
11
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

जेडीआयईटीत ‘स्फिलाटा’ उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 11:23 PM

येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इंजिनिअरिंग टेक्सटाईल विभागातर्फे राष्ट्रीयस्तरावरील स्पर्धा ‘स्फिलाटा-१८’ उत्साहात पार पडली.

ठळक मुद्देराष्ट्रीय परिषद : देशभरातील विविध महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांचा सहभाग

ऑनलाईन लोकमतयवतमाळ : येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इंजिनिअरिंग टेक्सटाईल विभागातर्फे राष्ट्रीयस्तरावरील स्पर्धा ‘स्फिलाटा-१८’ उत्साहात पार पडली. यात टेक्सटाईल इंजिनिअरिंगच्या विविध विषयांवर गारमेंट डिझाईनिंग, अ‍ॅसेसरिज डिझाईनिंग, रिअल मॉडेल ड्रेपिंग, फॅशन स्केचिंग अँड इल्यूस्ट्रेशन, पेपर व पोस्टर प्रेंझेंटेशन स्पर्धा झाली. उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून टेक्सटाईल असोसिएशन आॅफ इंडिया विदर्भ युनीटचे सचिव आर.के. मिश्रा, सल्लागार एस.पी. गाडगे, प्रा. अर्चना लांडे (नागपूर) उपस्थित होते. प्राचार्य डॉ. अविनाश कोल्हटकर अध्यक्षस्थानी होते. टेक्सटाईल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख प्रा. गणेश काकड, ‘स्फिलाटा-१८’चे समन्वयक प्रा. अजय राठोड, विद्यार्थी प्रतिनिधी हर्षल सम्रीत, नितेश धैर्या आदींचीही उपस्थिती होती.माँ सरस्वती आणि स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. स्मरणिका ‘टेक्सोरा-१८’चे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. नंतर गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. युनिव्हर्सिटीचे प्रतिनिधित्व करून राष्ट्रीयस्तरावर तायक्वांदो क्रीडा स्पर्धेत सहभागाबद्दल तुषार कापडे, महाविद्यालयात झालेल्या कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे पुगलिया वुलन मिल लि. वरळी मुंबई या कंपनीत निवड झाल्याबद्दल अभिलाष लांजेवार, यवतमाळच्या रेमण्ड कंपनीत निवडीबद्दल नितेश धैर्य, आरएसजे इन्स्पेक्शन सर्विसेस प्रा.लि. कंपनीत निवडीबद्दल हर्षल सम्रीत व प्रियंका लोखंडे यांना सन्मानित करण्यात आले.उद्घाटनानंतर गारमेंट डिझाईनिंग, अ‍ॅसेसरिज डिझाईनिंग, फॅशन स्केचिंग अँड इल्यूस्ट्रेशन, पेपर व पोस्टर प्रेंझेंटेशन स्पर्धा प्रदर्शनाचे दालन खुले करण्यात आले. यात देशातील विविध महाविद्यालयातील स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. गुंटूर (आंध्र प्रदेश), हैदराबाद (तेलंगाणा), दिल्ली, मुंबई, कोल्हापूर, लातूर, जळगाव, नांदेड, नागपूर, इचलकरंजी, अमरावती, वर्धा, अकोला, जळगाव, चिखली आदी ठिकाणचे स्पर्धक सहभागी झाले होते.परीक्षक म्हणून गारमेंट डिझाईनिंगसाठी प्रा. माया कांगणे, शासकीय महिला तंत्रनिकेतनच्या प्रा. चारूशीला गरद, अ‍ॅसेसरिज डिझाईनिंगसाठी प्रा. शीतल वनकर, प्रा. अनघा गाढवे, पेपर प्रेझेंटेशनसाठी प्रा. सुरज पाटील, पोस्टर प्रेझेंटेशनसाठी मिनल जयस्वाल, ए.पी. गाडगे, फॅशन स्केचिंग अँड इल्यूस्ट्रेशनसाठी प्रा. अर्चना लाडे, प्रा. राम सावत, प्रा. रेणूका मुळे यांनी काम पाहिले. गारमेंट डिझाईनिंगमध्ये यवतमाळ येथील शासकीय महिला तंत्रनिकेतनच्या उम्मे सलमा बोहरा आणि रेश्मा राऊत यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. व्हीएमव्ही अमरावतीच्या धनश्री सांगोले व अंकिता मालमकर यांनी द्वितीय, तर तृतीय बक्षीस गांधी ग्राम कॉलेज वर्धाची प्रणाली नंदूरकर हिने पटकाविले. डीकेटीई इचलकरंजीचे संपदा सालसकर व सुरदार दिवटे यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. अ‍ॅसेसरिज डिझाईनिंगमध्ये मेगा आर्ट अमरावतीच्या अश्रिता अग्रवाल व भूमिका कलिका यांनी प्रथम, तर याच संस्थेच्या प्रियंका जयस्वाल व पूजा चंडाले यांनी द्वितीय क्रमांक प्राप्त केला. पेपर प्रेझेंटेशनमध्ये डीकेटीई इचलकरंजीचे पंकज बजाज व स्तुती मालू यांनी प्रथम, व्हीजेटीआयई मुंबईच्या मयूरी ठाकूर व उन्नती कराडे यांनी द्वितीय, डीकेटीई इचलकरंजीचा संमेद पाटील याने तृतीय, तर ‘जेडीआयईटी’चे वरद जोशी व श्याम शिरे हे उत्तेजनार्थ पारितोषिकाचे मानकरी ठरले. पोस्टर प्रेझेंटेशनमध्ये डीकेटीईचे ऋषिकेश भक्कड, प्रतिक कुरेकर, निखिल कलिका यांनी प्रथम क्रमांक मिळविला. ससमिरा मुंबईचे आदित्य वृंदावन व अमित मौर्या यांना द्वितीय बक्षीस प्राप्त झाले. फॅशन स्केचिंग अँड इल्यूस्ट्रेशनमध्ये ‘जेडीआयईटी’चा आकाश कांबळे प्रथम बक्षिसाचा मानकरी ठरला. व्हीजेटीआय मुंबईचा स्वप्नील राठोड द्वितीय स्थानी राहिला.प्राचार्य डॉ. अविनाश कोल्हटकर, प्रा. गणेश काकड, एस.पी. गाडगे, प्रा.अर्चना लांडे, आर.के. मिश्रा यांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले. संचालन स्वप्नजा राऊत यांनी, तर आभार प्रा. अजय राठोड यांनी मानले. स्पर्धेचे प्रमुख प्रायोजक ग्लोसिस प्लस जळगाव, रेडिएंट अकॅडमी यवतमाळ, मायक्रोवर्ल्ड कॉम्प्युटर, क्लब फॉक्स यवतमाळ, शो आॅफ यवतमाळ, एसएसडी कलेक्शन यवतमाळ, सिटी गर्ल यवतमाळ, इलिमेंट मॉल यवतमाळ व यवतमाळ अर्बन बँक हे होते. ‘स्फिलाटा-१८’च्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे अध्यक्ष देवेंद्र दर्डा यांनी आयोजकांचे कौतुक केले, तर सचिव किशोर दर्डा यांचे मार्गदर्शन लाभले.यशस्वीतेसाठी प्रा. संदीप सोनी, टेसाचे समन्वयक प्रा. प्रशांत रहांगडाले, प्रा. मोनाली इंगोले, प्रा. रामचंद्र सावंत, प्रा. सुरज पाटील, अनंत इंगळेकर, श्याम केळकर, अमोल गुल्हाने, प्रीतम रामटेके, विनय चौरे, स्फिलाटाचे विद्यार्थी प्रतिनिधी अभिलाष लांजेवार, वैभव पद्मशाली, चेतन वारंबे, अक्षय कैकाडे, शुभम उगारे, आकाश मालवडे, कुणाल जोतवाणी, केविन पटेल, मयूर महेंद्रकर, अविनाश दास, युवराज जोशी, प्रज्ज्वल घोडे, अनय बाबूलकर, मृणाल डहाके, प्रियंका लोखंडे, अ‍ॅना सिरम, प्रणौती म्हैस्कर, भूमिका भलमे, सुप्रिया गेडाम, रंजना साबळे, माधवी राऊत, वैष्णवी कुबडे, दीपाली गुरनुले, सोनाली किलनाके, श्वेता पानपाटील, माधवी राऊत, तेजस्विनी ठुसे, ऐश्वर्या कुटेमाटे, रागिनी माळी आदींनी पुढाकार घेतला.

टॅग्स :JDIETजेडीआयईटी