शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
4
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
5
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
6
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
8
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
9
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
10
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
11
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
12
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
13
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
14
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
15
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
16
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
17
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
18
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
20
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी

जिवनदायिनी निर्गुडेने गाठला तळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 10:10 PM

शहराजवळून वाहणाऱ्या जिवनदायीनी निर्गुडा नदीने अखेर तळ गाठला आहे. या धरणातून सिंचनासाठी पाणी सोडल्याने नोव्हेंबरपर्यंत निर्गुडा नदीमध्ये पाणी कायम होते. परंतु आता ही नदी तळ गाठत असल्यामुळे वणीवर पुन्हा पाणी टंचाईचे सावट निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देपाणीटंचाईचे पुन्हा संकट : नवरगाव धरणात केवळ ६८.६९ टक्के जलसाठा

म.आसिफ शेख ।लोकमत न्यूज नेटवर्कवणी : शहराजवळून वाहणाऱ्या जिवनदायीनी निर्गुडा नदीने अखेर तळ गाठला आहे. या धरणातून सिंचनासाठी पाणी सोडल्याने नोव्हेंबरपर्यंत निर्गुडा नदीमध्ये पाणी कायम होते. परंतु आता ही नदी तळ गाठत असल्यामुळे वणीवर पुन्हा पाणी टंचाईचे सावट निर्माण झाले आहे. सध्या नवरगावच्या धरणात केवळ ६८.६९ टक्के जलसाठा शिल्लक राहिला आहे.शहराची लोकसंख्या जवळपास ८० ते ९० हजरांच्यावर असून निर्गुडा नदीद्वारेच नागरिकांना पाणी पुरवठा केला जातो. नळाद्वारे पाणी सोडण्याची योजना १९५८ पासून सुरू झाली. तेव्हा १५ ते २० हजार लोकांसाठी ही योजना कार्यान्वीत होती. मात्र आता शहराचा पसारा दिवसेंदिवस वाढत असून लोकसंख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तसेच गेल्या १० वर्षांपासून सुरू असलेल्या वेकोलिच्या कुंभारखणी भूमिगत कोळसा खाणीमुळे पाण्याची पातळी झपाट्याने कमी होत गेली. त्यामुळे नवरगाव धरणातून पाणी आरक्षित करून वणीत पाणी पुरवठा सुरू होता. नगरपरिषदेने मागीलवर्षी ५.९५ दलघमी पाणी आरक्षित केले.जिल्हाधिकाºयांनी या पाण्याचे नियोजन करून शहराला पाणी दिले. धरणात अल्प प्रमाणात पाणी असल्यामुळे महिन्यातून दोनवेळा पाणी सोडण्याचे नियोजन केले, तर राजूर पीठने शहराला चांगला आधार देऊन २० ते २५ ट्युबवेलमार्फत शहराची कशीबशी तहान भागविली. मागीलवर्षी १५ कोटी रूपयांची वर्धा नदीवरून पाईपलाईनद्वारे पाणी पुरवठा योजना आणली. मात्र जुलै महिन्यात या नदीला मोठा पूर आल्याने नदीवरचे तीन पंप वाहून गेले. त्यामुळे वणीपर्यंत पाणी पोहोचू शकले नाही. सध्या नगरपरिषदेने ४.०० दलघमी पाणी आरक्षित केले आहे. २.०० दलघमी पाणी वर्धा नदीतून घेतले आहे. नवरगाव धरणात सध्या ८.५७ दलघमी पाणीसाठा असून ६८.६९ टक्के जलसाठा शिल्लक राहिला आहे. नवरगाववरून या नदीत ००.१८ दलघमी पाणी सोडले असून ते गुरूवारी वणीपर्यंत पोहोचणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.कोळसा खाणीमुळे बावनमोडी नाला पडला कोरडागावाजवळून बारामाही वाहणाऱ्या बावनमोडी नाल्यातील जलसाठा आटल्याने गावातील नळयोजना प्रभावित झाली आहे. या नाल्याचा उगमस्थान राजूर येथे आहे. मात्र कोळसा खाणीमुळे सध्या पाण्याचा प्रवाह बंद पडला आहे. परिणामी गावकऱ्यांना ऐन हिवाळ्यातच पाणीसाठी भटकंती करावी लागत आहे. बावनमोडी नाल्याच्यालगत राजूर येथील विटभट्टी असून नाल्यावर इंजिन लावून विटाभट्टीसाठी पाण्याचा वापर केला जातो. त्यामुळे या नाल्याचे खोलिकरण व साफसफाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :riverनदी