किशोर वंजारी ।ऑनलाईन लोकमतनेर : राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा नेर तालुक्यात पुरता बोजवारा उडाला आहे. या योजनेंतर्गत काढल्या जात असलेल्या जॉब कार्डमध्ये प्रचंड प्रमाणात घोळ आहे. यादीमध्ये मृत लोकांचीही नावे आहे. याद्या करणाऱ्यांनी कार्यालयात बसूनच सर्व प्रक्रिया पार पाडल्याचे यावरून सिद्ध होत आहे. प्रशासनाची दिशाभूल करणाºया या लोकांवर कारवाई व्हावी, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.सदर योजनेंतर्गत लोकांना कामे उपलब्ध करून दिल्या जातात. यासाठी जॉब कार्ड काढावे लागते. शिवाय काही योजनांच्या लाभासाठीही सदर कार्ड जोडणे आवश्यक आहे. कृषी योजनांचा लाभ पाच एकरपर्यंत शेती असलेल्या लोकांना जॉब कार्डच्या आधारे दिला जातो. मात्र यामध्ये अधिक लोकांनी शिरकाव केला आहे. विविध योजनांचे ते लाभार्थी ठरले आहेत.जॉब कार्ड असणाºया मजुरांना शासनाच्या कुठल्याही कामावर निर्धारित दरामध्ये काम उपलब्ध करून दिले जाते. रस्ते तयार करणे, खड्डे बुजविणे याशिवाय शासनामार्फत हाती घेण्यात आलेल्या कुठल्याही कामांवर त्यांना प्राधान्य दिले जाते. मजुरांना अपवादानेच याचा लाभ मिळाला आहे. दुसरीकडे मात्र काही लोकांनी जॉब कार्डचा गैरवापर केल्याचे दिसून येत आहे. शिवाय याद्या तयार करताना करण्यात आलेली दिरंगाई योजनेच्या यशस्वीतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. दिवंगत लोकांचीही नावे या यादीमध्ये समाविष्ट आहे.याद्या तयार करताना मजूर अथवा इतर लोकांकडून अर्ज मागणी केली जाते. असे असतानाही दिवंगत लोकांची नावे या यादीमध्ये कशी आली हा प्रश्न निर्माण केला जात आहे.नाव एकाचे, छायाचित्र दुसऱ्याचेजॉब कार्ड तयार करताना चुकांचीही प्रचंड गर्दी झाली आहे. नावांमध्ये असलेल्या चुका अगणित आहे. शिवाय कार्ड बनविण्यातही चुकांची मालिका आहे. नाव एकाचे आणि छायाचित्र दुसऱ्याचे असा प्रकार अनेक जॉब कार्डमध्ये घडला आहे. त्यामुळे नेमके कार्ड कुणाचे हा प्रश्न निर्माण होतो. दोनही व्यक्तीला या प्रकाराने मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते.
जॉब कार्डचा घोळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2018 11:21 PM
राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा नेर तालुक्यात पुरता बोजवारा उडाला आहे. या योजनेंतर्गत काढल्या जात असलेल्या जॉब कार्डमध्ये प्रचंड प्रमाणात घोळ आहे.
ठळक मुद्देयोजनेची ‘वाट’ : नेर तालुक्यात यादीमध्ये मृतांचीही नावे