किशोर वंजारी ।आॅनलाईन लोकमतनेर : मनात जिद्द आणि जिंकण्याची अभिलाषा असली की काहीही होऊ शकते. यश पायघड्या घातले. एका शेतकऱ्याच्या मुलाने न्यायाधीश होऊन नेर तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवत तो अनेकांसाठी प्रेरणास्रोत ठरला आहे.पाथ्रड (गोळे) या छोट्याशा गावातील आणि सध्या नेर शहरात वास्तव्याला असलेले ज्ञानेश्वर गोळे याचा मुलगा निशांतची ही यशकथा. शेती करायची, शिक्षण घ्यायचे आणि शिक्षक व्हायचे, ही निशांतची इच्छा. पण मामाच्या आग्रहाखातर त्याने अमरावती येथे विधी महाविद्यालयात प्रवेश घेतला, वकील झाला. यवतमाळ येथील सेवानिवृत्त न्यायाधीश सतीश तत्ववादी यांनी न्यायाधीशाची परीक्षा देण्याची ऊर्जा त्याच्यात निर्माण केली. मित्रही याच अभ्यासाचा मिळाला. सतीश जयस्वाल आणि निशांतने भरपूर तयारी केली. सतीश जयस्वाल गतवर्षी न्यायाधीश म्हणून रूजू झाले यावर्षी निशांत गोळे न्यायाधीश बनले.महाराष्ट्रातील नवनियुक्त १३१ न्यायाधीशांमध्ये निशांतचा समावेश आहे. स्वत:शी प्रामाणिक राहा, आपल्यातील उणिवा कठोर परिश्रमाने दूर करा, ध्ये निश्चित करा, यश नक्कीच मिळेल हा निशांतचा संदेश आहे. निशांतचा दोन महिन्यापूर्वीच नक्षत्राशी विवाह झाला. तीसुध्दा वकील आहे. तिचीही न्यायाधीश होण्याची इच्छा इच्छा आहे. निशांतच्या न्यायाधीश होण्याचा आनंद वडील ज्ञानेश्वर आणि आई विद्याच्या चेहºयावर ओसंडून वाहत आहे. मुलगा न्यायाधीश झाल्याचा आनंद शब्दात सांगता येत नाही. प्रत्येक आईवडिलांची मुलांनी शिकावं, मोठं व्हावं ही इच्छा, स्वप्न असते. निशांतने स्वप्न पूर्ण केले, अशी प्रतिक्रिया विद्या गोळे यांनी नोंदविली.नेरचा युवक न्यायाधीश झाला ही गौरवाची, आनंदाची बाब आहे. परिश्रमाची तयारी आणि जिद्दीने निशांतने हे यश मिळविले. अनेकांसाठी तो प्रेरणास्रोत ठरला आहे.-अॅड. बाबा चौधरी, नेर
शेतकऱ्याचा मुलगा झाला न्यायाधीश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2018 10:10 PM
मनात जिद्द आणि जिंकण्याची अभिलाषा असली की काहीही होऊ शकते. यश पायघड्या घातले. एका शेतकऱ्याच्या मुलाने न्यायाधीश होऊन नेर तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवत तो अनेकांसाठी प्रेरणास्रोत ठरला आहे.
ठळक मुद्देनेरच्या शिरपेचात मानाचा तुरा : करायचे होते ज्ञानदान, आता करणार न्यायदान