यवतमाळ : श्री शिवाजी विद्यालयात भारताचे पहिले कृषिमंत्री, शिक्षणमहर्षी व कृषीरत्न डॉ. पंजाबराव उपाख्य भाउसाहेब देशमुख यांच्या ११७ वा जयंती उत्सव २६ ते ३० डिसेंबरपर्यंत होत आहे. २६ रोजी उत्तमराव ठाकरे यांच्या हस्ते संस्थेच्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात येईल. २७ रोजी जयंतीदिनी भाउसाहेबांना अभिवादन कार्यक्रम होणार आहे. २८ रोजी मुख्य सोहळा अॅड. भैयासाहेब पावडे यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे. प्रमुख वक्ते म्हणून प्रा. विवेक देशमुख राहणार असून प्रमुख अतिथी म्हणून शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर, गुणवंतराव देशमुख, उत्तमराव ठाकरे, डॉ.प्रभाकरराव काळमेघ उपस्थित राहणार आहे. २८ व २९ रोजी विविध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, आनंद मेळावा होणार आहे. ३० रोजी बक्षीस वितरण सोहळा मुख्याध्यापक मोहन मडावी यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून प्रमुख अतिथी म्हणून डॉ.प्रभाकरराव काळमेघ, नगरसेविका वैशाली सवाई व साधना काळे, नंदू बुटे, पालक प्रतिनिधी प्रकाश क्षीरसागर उपस्थित राहणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
कृषीरत्न पंजाबराव देशमुख जयंती उत्सव
By admin | Published: December 26, 2015 2:36 AM