शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
3
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
4
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
5
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
6
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
7
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
8
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
9
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
10
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
11
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
12
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
13
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
14
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
16
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
17
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
18
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
19
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
20
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'

कलावतीला राहुल गांधींनी की मोदींनी मदत केली? अमित शाहंचा लोकसभेतील दावा किती खरा...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2023 9:17 AM

यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यातील जळका येथील परशुराम बांदूरकर यांनी नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली होती.

लोकमत न्यूज नेटवर्क  यवतमाळ : १५ वर्षांपूर्वी २००८ मध्ये राहुल गांधी विदर्भ दौऱ्यावर आले असता त्यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची पत्नी कलावती बांदूरकर यांच्या झोपडीला भेट देऊन आत्महत्येमागील परिस्थिती जाणून घेतली होती. संसदेत कलावतीचा विषय निघाल्याने राहुल गांधींची ती भेट पुन्हा चर्चेत आली. या भेटीनेच कलावतीचे आयुष्य बदलून टाकले.  

यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यातील जळका येथील परशुराम बांदूरकर यांनी नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली होती. आत्महत्येच्या या घटनेनंतर २००८ मध्ये राहुल गांधी विदर्भाच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी अचानक जळका  गावी जाऊन आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याची पत्नी कलावती यांच्या झोपडीवजा घराला भेट देऊन सांत्वन केले. त्यांच्या घरी चहाही घेतला. त्यानंतर दिल्लीला परतल्यावर लोकसभेच्या सभागृहात राहुल यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाची व्यथा सभागृहात मांडत कलावतीचा मुद्दा उपस्थित केला. संसदेतील या चर्चेने कलावती या देशभरात प्रकाशझोतात आल्या होत्या.  

यानंतर कलावती यांच्यासाठी विविध स्तरांतून मदतीचा ओघही सुरू झाला. सुलभ इंटरनॅशनल संस्थेचे संस्थापक डॉ. बिंदेश्वर पाठक यांनी तातडीने कलावतीची जळका गावी जाऊन भेट घेतली आणि ३६ लाख रुपयांची आर्थिक मदत केली. या मदतीतून कलावतीने कर्जाची परतफेड तर केलीच. शिवाय उरलेली रक्कम बँकेत फिक्स डिपॉझिट म्हणून ठेवली आणि  यातून मिळणाऱ्या पैशांवर सात मुली आणि दोन मुले अशा मोठ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविला. एवढेच नव्हे तर याच पैशातून तिने मुलींची लग्न आणि मुलांचे शिक्षणही पूर्ण केले. 

या भेटीनंतरच काँग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनीही कलावतीची भेट घेऊन शासकीय योजनेतून कलावतीला घरकुल, वीजजोडणी, पिण्याच्या पाण्याचा नळ, टिनपत्रे अशी मदत केली होती. राहुल गांधी यांच्यामुळेच मला जगण्याचा मार्ग मिळाल्याचे कलावती आवर्जून सांगतात.

चर्चा ऐकली, वाईट वाटले बुधवारी सभागृहात माझ्या अनुषंगाने पुन्हा शेतकरी आत्महत्येचा विषय निघाल्याचे समजले. माझा मुलगा प्रीतम यानेही मला चर्चेबाबत सांगितले. ऐकून वाईट वाटले. खरे तर राहुल गांधी यांच्या भेटीनंतरच माझे आयुष्य रुळावर आले. जे काही मिळाले ते २०१४ पूर्वीच मिळाल्याचे कलावती यांनी सांगितले. प्रीतम याचे बी.कॉम.पर्यंत शिक्षण झाले असून तो वणी येथे स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहे. त्यानेही राहुल गांधी यांच्या भेटीनंतर कुटुंबामध्ये झालेला बदल कथन केला.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधी