लोकमत न्यूज नेटवर्कपारवा : घाटंजी तालुक्याच्या पारवा येथील पारवेकर घराण्यातील ज्येष्ठ आणि महाराष्ट्र हाऊसिंग फायनान्सच्या माजी उपाध्यक्ष कांताबाई शिवराव उर्फ बाळासाहेब देशमुख पारवेकर यांचे सोमवारी दुपारी यवतमाळ येथे त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. त्या ७३ वर्षांच्या होत्या. माजी आमदार नीलेश देशमुख पारवेकर (दिवंगत), जिल्हा परिषदेचे माजी सदस्य योगेश देशमुख पारवेकर यांच्या त्या मातोश्री, माजी आमदार अण्णासाहेब देशमुख पारवेकर यांच्या काकू तर माजी आमदार नंदीनी पारवेकर यांच्या सासु होत्या.कांताबाई यांच्या पार्थिवावर मंगळवार, ३० एप्रिल रोजी पारवा येथील पारवेकर घराण्याच्या ‘शांतीस्थळ’ येथे सकाळी १० वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहे.
कांताबाई पारवेकर यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 9:36 PM