लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथे शिक्षण घेत असलेल्या दोन काश्मिरी विद्यार्थ्यांना युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी अश्लील शिवीगाळ करून मारहाण केली. या निंदनीय प्रकाराचा निषेध नोंदविण्यात आला आहे. शांतता व सुव्यवस्था भंग करणाऱ्या कारवायांना पायबंद घालावा, अशी मागणी जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.निवडणूक काळात असे प्रकार घडणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आदेश संबंधितांना द्यावे असेही सर्वपक्षीय प्रतिनिधींनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे. ‘नाग’ संघटनेचे आनंद गायकवाड, सत्यशोधक समाजाचे डॉ. दिलीप घावडे, रिपब्लिकन पार्टीचे नवनीत महाजन, संजय बोरकर, गोविंद मेश्राम, वंचित बहुजन आघाडीचे विठ्ठलराव नागतोडे, बीआरएसपीचे सुनील पुनवटकर, भारतीय बौद्ध महासभेचे धर्मपाल माने, भीमसिंह चव्हाण, समता सैनिक दलाचे डी.के. हनवते, रत्नपाल डोफे, बहुजन समाज पार्टीचे धनराज धवने, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राजरत्न गणवीर, रवींद्र तिवारी, अशोक इंगोले, आंबेडकरी साहित्य व कला अकादमीचे कवडुजी नगराळे, अरविंद खोब्रागडे आदींनी निवेदन सादर केले. मारहाणप्रकरणी दोषींवर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
काश्मिरी विद्यार्थ्यांना मारहाणीचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 9:59 PM
येथे शिक्षण घेत असलेल्या दोन काश्मिरी विद्यार्थ्यांना युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी अश्लील शिवीगाळ करून मारहाण केली. या निंदनीय प्रकाराचा निषेध नोंदविण्यात आला आहे. शांतता व सुव्यवस्था भंग करणाऱ्या कारवायांना पायबंद घालावा, अशी मागणी जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
ठळक मुद्देविविध संघटना : शांतता भंग करणाऱ्या कारवायांना पायबंद घाला