लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोतवालांना चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा यासाठी राज्यभर कामबंद आंदोलन सुरू आहे. येथील तिरंगा चौकात कोतवाल संघटनेच्यावतीने सोमवारी धरणे देण्यात आले.गावपातळीवर काम करणाऱ्या कोतवालाला चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याचा दर्जा द्यावा, ही मागणी अनेक वर्षांपासून शासन दरबारी प्रलंबित आहे. आता कोतवाल संघटनेने निर्णायक भूमिका घेतली असून राज्यभर कामबंद पुकारला आहे. यात १२ हजार ६३७ कोतवाल सहभागी झाले आहेत. यवतमाळ जिल्ह्यात ७५० कोतवाल आंदोलनात आहेत. या आंदोलनामुळे शेतसारा वसुलीला फटका बसला असून गावपातळीवरील कामकाज ठप्प झाले आहे. ३० डिसेंबरपर्यंत मागण्यांची पूर्तता न झाल्यास ३१ डिसेंबरपासून अन्नत्याग आंदोलनाचा इशारा दिला आहे. या आंदोलनाचे नेतृत्व राज्य उपाध्यक्ष शंकर चव्हाण करीत असून त्यांच्यासोबत दिलीप इंगोले, विजय खांडेकर, संजय निरपुडे, मिलिंद बनसोड, दिनेश अगलधरे यांचा सहभाग आहे.
कोतवालांचे कामबंद आंदोलन सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 9:35 PM