पुसद : येथील गोकुळनगरीत घाणीचे साम्राज्य
पसरले आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात
सापडले आहे.
शहरालगतच्या सर्वांत मोठ्या व श्रीमंत श्रीरामपूर ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या गोकुळनगरीमध्ये घाणीचे साम्राज्य पसरले आहे. या समस्येकडे श्रीरामपूर ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व अधिकाऱ्यांचे पूर्णतः दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे. निवडणुकीत दिलेले आश्वासन विसरून पदाधिकारी केवळ विजयी अविर्भावात भटकंती करत असल्याचा आरोप होत आहे.
गोकुळनगरीसह अनेक वॉर्डात कचऱ्याचे ढिगारे वाढीस लागले आहे. रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. पदाधिकारी, सदस्यांनी समस्येकडे लक्ष्य देऊन कचऱ्याचे ढिगारे नष्ट करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे. अन्यथा नागरिक तीव्र आंदोलनाच्या तयारीत आहे.