हरिओम बघेल।लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : नागपूर-बोरी-तुळजापूर मार्गावरील ‘कोसदनी’चा घाट प्रसिद्ध आहे. हा घाट डोंगराच्या मधातून गेला. घाट तसा लांब नाही. मात्र घाटाखालील वळण ‘जिवघेणे’ ठरले आहे. तेथे सातत्याने अपघात होतात. आता रस्ता रूंदीकरणात हा घाटच नाहीसा होणार आहे.नागपूर-बोरी-तुळजापूर हा मार्ग आता ‘राष्ट्रीय महामार्ग’ झाला आहे. त्यामुळे आता हा ८० फूट रूंद असलेला रस्ता तब्बल २०० फुटांचा होणार आहे. हा रस्ता चारपदरी होणार आहे. मात्र कोसदनी घाटातील अपघात भविष्यात बंद होतील किंवा नाही, याबाबत साशंकताच आहे. या घाटात आत्तापर्यंत समोरासमोर धडक लागल्यानेच मोठ्या प्रमाणात अपघात घडले. वरून खाली ऊतरणारे वाहन समोरील वाहनावर जाऊन आदळल्याने अपघात झाले. वरुन खाली ऊतरताना वळण असल्याने अंदाज चुकतो व अपघात होतो. हा प्रकार नेहमी घडतो.रस्ता रुंदीकरणात घाटातील जिवघेणे वळण सरळ होणार आहे. परिणामी कोसदनी घाट नाहीसा होईल. त्यामुळे अपघाताची भीती कमी होईल. रस्ता रूंदीकरणाला किमान एक किंवा दोन वर्षे लागण्याची शक्यता आहे. या भागात जंगली भाग जादा असल्याने रूंदीकरणाला परवानगी मिळण्यास वेळ लागणार आहे. घाटापुढे नाल्यावर मोठा पूल होणार आहे. यामुळे या घाटाची ‘लेव्हल मेंन्टेन’ होईल. परिणामी हा रस्ता सरळ होईल. प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित होईल. अपघाताची मालिका बंद होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.नुकतेच १२ भाविकांचे गेले बळीआत्तापर्यंत कोसदनी घाटात अनेक मोठे अपघात घडले. नुकत्याच झालेल्या अपघातात पंजाब, हरियाणा, दिल्ली, नागपूर येथील १२ भाविकांचा मृत्यू झाला. त्यापूर्वीही अनेकांनी अपघातात जीव गमावला. अनेकांना कायमचे अपंगत्व आले. अनेकांचे संसार अपघातांनी उघड्यावर पडले. मात्र रस्ता रूंदीकरणात हा घाटच नाहीसा होण्याची शक्यता आहे. हा घाट रूंद होणार असल्यामुळे भविष्यात तेथे वळण राहणार नाही, अशी माहिती नॅशनल हायवेचे अभियंता एस.बी. जुनगरे यांनी दिली.
कोसदनीचा घाट होणार सरळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2018 10:26 PM
नागपूर-बोरी-तुळजापूर मार्गावरील ‘कोसदनी’चा घाट प्रसिद्ध आहे. हा घाट डोंगराच्या मधातून गेला. घाट तसा लांब नाही. मात्र घाटाखालील वळण ‘जिवघेणे’ ठरले आहे. तेथे सातत्याने अपघात होतात.
ठळक मुद्देअपघात मालिका : आत्तापर्यंत गेले शेकडो जीव