लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या यवतमाळ विभागात ‘कोविड-१९’चे नियम अधिकारी ते कर्मचाऱ्यांकडून पायदळी तुडविले जात आहे. विशेष म्हणजे, या कार्यालयाचे काही कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहे. कामगार संघटनांची बैठक घेण्यापासून ते १०० टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती ठेवण्यापर्यंत या कार्यालयाने नियम पायदळी तुडविण्याचा प्रताप केलाआहे.लोकांनी गर्दी करू नये, यासाठी सोशल डिस्टन्सिंग, मास्क लावून राहणे, सॅनिटायझरचा वापर, साबणाने हात स्वच्छ धुणे आदी नियम घालून देण्यात आले आहे. यातील काही बाबी कर्मचारी वैयक्तिकरित्या पाळत असल्या तरी बैठका, ठरवून दिलेल्या मर्यादेत हजेरीचे नियम पाळले जात नाही. कोरोनाचा प्रकोप वाढत चाललेला असतानाही महामंडळाच्या विभागीय कार्यालयाला जाग कशी येत नाही, हा प्रश्न याठिकाणी उपस्थित केला जात आहे.२६ मे रोजी विभाग नियंत्रकांनी कामगार संघटनेची बैठक बोलाविली होती. वास्तविक विभाग नियंत्रकांचे कक्ष बैठक घेण्याऐवढे विस्तीर्ण नाही. यानंतरही त्यांनी विभाग नियंत्रकांसह सात अधिकारी आणि कामगार संघटनेचे प्रतिनिधी अशा १७ जणांची बैठक घेतली. कमीत कमी कर्मचाºयांमध्ये कामकाज चालवावे, असे आदेश असताना विभागीय कार्यालयामध्ये १०० टक्के उपस्थिती ठेवली जाते. या प्रकारात साथरोग अधिनियमाचा भंग झाला. याप्रकरणी विभाग नियंत्रकांवर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे प्रादेशिक सचिव अरुण गाडगे यांनी जिल्हाधिकाºयांकडे केली होती. त्यावर कारवाई झाली नाही. त्यामुळे सोमवार, ७ सप्टेंबर रोजी पुन्हा गाडगे यांनी तक्रार देवून विभाग नियंत्रकांवर गुन्हा नोंदविण्याची मागणी केली आहे. विभागीय कार्यालयात कोरोनाचा पहिला पॉझिटिव्ह आल्यानंतर कर्मचाºयांनी बाहेर निघून रोष व्यक्त केला होता.नियमापेक्षा अधिक प्रवासी घेवून वाहतूकएसटी बसद्वारे ‘कोविड-१९’चे नियम तोडून प्रवासी वाहतूक केली जात आहे. या प्रकारात कोरोनाचा प्रसार वाढण्याची भीती खुद्द महामंडळ कर्मचाºयांकडून व्यक्त केली जात आहे. शिवाय स्वत:च्या सुरक्षिततेविषयीसुद्धा त्यांच्याकडून चिंता व्यक्त केली जात आहे. आंतरजिल्हा प्रवासी वाहतूक सुरू झाल्यापासून काही मार्गावर ३५ ते ४० प्रवासी घेवून एसटी बसेस धावत आहे. २२ पेक्षा अधिक प्रवासी घेऊ नये, ज्येष्ष्ठ नागरिक , बालकांची वाहतूक करण्यात येवू नये आदी नियम ‘कोविड-१९’ अंतर्गत घालून देण्यात आले आहेत. यानंतरही यवतमाळ आगारातून सुटणाऱ्या बसेसमधून नियम तोडून प्रवासी वाहतूक होत आहे. बसस्थानकावर एसटी बसेसमध्ये प्रवासी भरणाºया कर्मचाºयांकडूनच जादा प्रवासी घेण्याची सक्ती केली जात असल्याची ओरड कर्मचाºयांमधून होत आहे. ठरवून दिलेल्या संख्येनुसारच प्रवासी वाहतूक करावी, अशी मागणी प्रवाशांकडूनही होत आहे. यासंदर्भात यवतमाळ आगार व्यवस्थापक रमेश उईके यांना विचारले असता, नियमानुसारच प्रवासी वाहतूक केली जात आहे. गर्दी वाढलेल्या मार्गावर अधिक बसेस सोडण्यात येते. कदाचित एखाद्यावेळी प्रवाशाच्या विनंतीवरून जादा वाहतूक झाली असू शकते. मात्र आवश्यक ती खबरदारी घेतली जात असल्याचे ते म्हणाले.
एसटीत कोविडचे नियम पायदळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2020 5:00 AM
२६ मे रोजी विभाग नियंत्रकांनी कामगार संघटनेची बैठक बोलाविली होती. वास्तविक विभाग नियंत्रकांचे कक्ष बैठक घेण्याऐवढे विस्तीर्ण नाही. यानंतरही त्यांनी विभाग नियंत्रकांसह सात अधिकारी आणि कामगार संघटनेचे प्रतिनिधी अशा १७ जणांची बैठक घेतली. कमीत कमी कर्मचाºयांमध्ये कामकाज चालवावे, असे आदेश असताना विभागीय कार्यालयामध्ये १०० टक्के उपस्थिती ठेवली जाते.
ठळक मुद्देकर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह : १०० टक्के उपस्थितीत काम, रोष व्यक्त करत केले होते काम बंद