लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोनावर मात करण्यासाठी आरोग्य विभागाची यंत्रणा तोकडी पडल्याने आरोग्य विभागाने कंत्राटी पदभरती करून साथ थोपविण्याचा पूर्णत: प्रयत्न केला. त्यात त्यांना यशही आले. आता कोरोना संपल्यानंतर यातील कर्मचाऱ्यांना कमी करण्यात आले आहे, तर काही दिवसांनंतर काही कर्मचाऱ्यांना नव्याने नियुक्ती मिळाली आहे. मात्र, अनेक कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले आहे. कोरोना काळात डाॅक्टर, इसीजी तंत्रज्ञ, बीएएमएस डाॅक्टर, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, डाटा एंट्री ऑपरेटर, औषधी निर्माता अधिपरिचारिका या पदांवर ३५० कर्मचाऱ्यांना नियुक्ती देण्यात आली होती. कंत्राटी स्वरूपाच्या या पदभरतीत अनेकांना कमी करण्यात आले. आता अलीकडे यातील २५० कर्मचाऱ्यांना कोविडच्या कामासाठी नियुक्ती मिळाली आहे. या ठिकाणी काम करणारे कोरोना योद्धे कामावरून कमी करताना मानधन न मिळाल्याच्या प्रकाराने संतप्त झाले. अडचणीच्या काळात काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाचा मोबदला मिळाला नाही. यामुळे ते आर्थिक अडचणीत आहे. याशिवाय यातील काही कर्मचाऱ्यांना अजूनही रोजगाराची नवी संधी उपलब्ध झाली नाही. यामुळे या कर्मचाऱ्यांचे संपूर्ण कुटुंब अडचणीत आले आहे. त्यांनी मानधनाची आणि नियुक्ती मागणी केली आहे.
आर्थिक तरतुदीअभावी मानधन अडखळलेकोविडमध्ये लागलेल्या कर्मचाऱ्यांना मानधन वितरित करताना दर महिन्यास विलंब लागला आहे. एका महिन्याचे मानधन दुसरा महिना अर्धा संपल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या हातात पडले आहे.सर्वात अखेरच्या महिन्यात ज्या कर्मचाऱ्यांचे मानधन रखडले त्याला आर्थिक तरतुदीचा अडथळा आहे.राहिलेल्या कर्मचाऱ्यांना लवकरच मानधन उपलब्ध होणार आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना कामाचा मोबदला मिळेल.
मान दिल्याने पोट नाही भरतआम्हाला नोकरीवरून कमी केले. तडकाफडकी निर्णय घेण्यात आला. काढताना काम केलेल्या दिवसाचे वेतनही मिळाले नाही. आता बेरोजगारी आणि कामाचा शोध सुरू आहे. आम्हाला मानधन मिळाले असते तर अडचणी दूर झाल्या असत्या. सर्वांनाच कामावर घ्यावे.- फैजान दानिश, कर्मचारी
आरोग्य विभागाला तिसरी लाट येणार असल्याची माहिती आहे. यानंतरही आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना कमी करण्यात आले. आरोग्य विभागाने अनुभवी कर्मचाऱ्यांना कायम ठेवायला पाहिजे होते. याशिवाय राहिलेले मानधनही द्यायला हवे. - डाॅ. शारीवाह अन्नदाते
जूनचे मानधन अद्याप मिळाले नाही. आम्हाला नियुक्ती देतानाच काम नसल्यास काढण्यात येईल, अशा सूचना दिल्या होत्या. कामावरून कमी झाल्यानंतर तत्काळ जाॅब मिळत नाही. तरी अनेकजण खासगी नोकरी करीत आहे, तर काही शोधात आहे. - डाॅ. किंजल पटेल
सध्या काम नाही, काम उपलब्ध होताच आवश्यकतेनुसार भरती होईलआरोग्य विभागाने काम नसलेल्या कर्मचाऱ्यांना कमी केले. तिसऱ्या लाटेमध्ये आवश्यकता भासल्यास कर्मचाऱ्यांना नियुक्ती दिली जाणार आहे. त्यांना नियुक्ती देतानाच आवश्यकतेनुसार कामावर ठेवले जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. तसा बाँड त्यांच्याकडून लिहून घेण्यात आला होता. जिल्ह्यात सध्या सोळा ठिकाणी केंद्र सुरू आहे.
कर्मचाऱ्यांचे मानधन नेमके कशामुळे थांबले याची मला कल्पना नाही. मात्र, ग्रॅन्डअभावी मानधन थांबले असावे. ज्या कर्मचाऱ्यांनी आपल्या कार्यकाळात कामकाज पूर्ण केले. त्यांना त्यांच्या कामाचा मोबदला लवकरच मिळेल. आरोग्य विभागाकडे याबाबत विचारणा करण्यात येईल. माझ्याकडे सध्या तरी या प्रकरणात काही तक्रारी आलेल्या नाही. कोविड काळातील कर्मचाऱ्यांना मानधन मिळेल. - अमोल येडगे, जिल्हाधिकारी