Prakash Ambedkar ( Marathi News ) : गेल्या काही दिवसापासून राज्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनं सुरू आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षणाची मागणी केली आहे. या आरक्षणाला ओबीसी नेत्यांनी विरोध सुरू केला आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यवतमाळ येथे आरक्षण बचाव यात्रेत उपस्थित होते. यावेळी त्यांनी कुणबी मराठा हे खरे ओबीसी नाहीत, असं वक्तव्य केलं.
मध्यप्रदेशमध्ये मोठी दुर्घटना; भिंत कोसळून ८ मुलांचा मृत्यू, शिवलिंग बनवत होते
वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर म्हणाले, कुणबी मराठा हे खरे ओबीसी नाहीत, त्यामुळे त्यांच्यापासून सावध रहा. विधिमंडळात १९० कुणबी मराठा आमदार आहेत. यात फक्त ११ ओबीसी आमदार आहेत. त्यामुळे ओबीसी आरक्षणाला १०० टक्के धोका आहे, असं वक्तव्य आंबेडकर यांनी केलं.
"कुणबी हा स्वत:ला ओबीसी म्हणत असला तरी तो सभागृहात मराठ्यांसोबत आहे, असं सांगतो. तो धनगरांसोबत नाही, तो माळ्यांसोबत नाही, तो वंजारी, लिंगायत, बंजारा यांच्यासोबत नाही. तो तेली, तांबोळी, कुणबी, लोहार, सोनार यांच्यासोबत नाही. म्हणून मी तुम्हाला सावध रहा असं सांगत आहे. ओबीसी आरक्षणाला धोका आहे. येणाऱ्या निवडणुकीनंतर हा धोका निर्माण होईल, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.
मी त्यांनी कधीच उत्तर दिले नाही: मनोज जरांगे पाटील प्रकाश आंबेडकर यांच्या या वक्तव्यावर मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. जरांगे पाटील म्हणाले, मी त्यांना कधी उत्तर दिलं नाही आणि देणारही नाही. मी गोर गरिबाच कल्याण होईल असं च पाऊल उचलले आहे, सगळ्या जाती धर्माला न्याय देणार, असंही जरांगे पाटील म्हणाले.
३ आमदारांच्या शिष्टमंडळाची जरांगे यांच्याशी तासभर चर्चा
१३ ऑगस्टपर्यंत शासनाने मागण्या मान्य कराव्यात. आम्ही राजकारणात जाणार नाहीत; परंतु मागण्यांवर योग्य विचार न झाल्यास समाजाच्या म्हणण्यानुसार आम्हाला निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी दिला.
जरांगे यांचा ७ ऑगस्टपासून दौरा सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी दुपारी बार्शीचे राजेंद्र राऊत, बदनापूरचे नारायण कुचे, तुळजापूरचे राणाजगजितसिंह पाटील या तीन आमदारांच्या शिष्टमंडळाने जरांगे यांची भेट घेऊन एक तास चर्चा केली. या चर्चेनंतर जरांगे यांनी माध्यमांशी संवाद साधला. विधानसभा काय असते हे निवडणुकीत कळेल. १३ ऑगस्टपर्यंत वेळ दिला आहे. त्यामुळे त्यांनी वेळेत मागण्या मान्य कराव्यात. त्यातही आमची बैठक २९ ऑगस्टला होणार आहे. त्यामुळे २९ तारखेपर्यंत सरकारवर विश्वास ठेवणे आमचे काम आहे. त्यानंतर मात्र समाज सांगेल तो निर्णय घेऊ, असे ते म्हणाले.