या ऑनलाइन परिचय मेळाव्यात महाराष्ट्रातील नागपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, औरंगाबाद, पुणे, मुंबई येथील ग्रामीण व शहरी भागातील त्याचप्रमाणे मध्य प्रदेशातील जबलपूर, इंदोर, भोपाल, रायपूर येथील बावणे कुणबी समाजाचे उपवर-वधू व पालक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. जवळपास ८५ च्यावर उपवधू-वरांनी मेळाव्यात नोंदणी करून आपला ऑनलाइन परिचय दिला. ३०० च्या वर समाजबांधव ऑनलाइन सहभागी झाले होते. या आभासी कार्यक्रमाच्या उद्घाटनपर भाषणात कमलेश ठवकर यांनी बी. के. संपर्क समूहाच्या वतीने आयोजित विविध उपक्रमाचा लाभ समाजास होत असल्याचे सांगितले.
अध्यक्षस्थानी पुणे येथील बावणे कुणबी सामाजिक संस्थेचे कार्याध्यक्ष लक्ष्मणराव शेलोकर होते. त्यांनीही बी. के. संपर्क ग्रुप नेहमीच आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करीत समाज जोडण्याचे कार्य करीत असल्याचे सांगितले. केंद्रीय समिती नागपूरचे अध्यक्ष के. टी. मते, माजी नगरसेविका ममता भोयर, गणेश भोयर यांनी समाज हिताच्या उपक्रमाला आपले पूर्ण योगदान व सहकार्य असल्याचे स्पष्ट केले. डाॅ. आनंद भोयर, ॲड. हेमंत बोरकर, रतीराम आस्वले, अशोक वाघाळे, अरविंद जगनाडे, योगाचार्य रामकृष्ण ठवकर, मंगला डहाके, रेखा ढबाले, सुधा वहीले, नरेंद्र लांजेवार, भगवंत ईश्वरकर, गोपीचंद मते, प्रेमलाल कडव, पांडुरंग मुटकुरे, प्रमोद बांडाबुचे, सुरेश वनवे, राजेंद्र भुते, बाबासाहेब तुमसरे, किशोर चौधरी, देवेंद्र भुते, राजेश वनवे, प्रवीण राघोर्ते, सुरेश वनवे, प्रदीप कानतोडे आदींनीही मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविक प्रा. केशव चेटुले, संचालन प्रणय गोमासे, तर आभार सुभाष धांदे यांनी मानले. यशस्वीतेसाठी तांत्रिक समिती प्रमुख देवराव मते, प्रणय गोमासे, मंगला डहाके, रतीराम आस्वले, राम मते आदींनी परिश्रम घेतले.