ज्ञानेश्वर ठाकरे ।लोकमत न्यूज नेटवर्कमहागाव : शहरातील विविध ले-आऊटमध्ये नागरी सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले. ले-आऊट निर्मिती करताना नगर रचना विभागाकडून स्थळ निरीक्षण करण्यात येते. तरीही नियमांना फाटा देऊन ले-आऊटधारक दुकानदारी थाटतात.महागावात अनेक ले-आऊटमध्ये कोणत्याच नागरी सुविधा नाही. तरीही त्यांची दुकानदारी थाटात सुरू आहे. अनेक भागात नदी, नाल्याकाठी ले-आऊट निर्मिती करण्यात आली. मात्र निसर्गाचा समतोल बिघडला व जादा पाऊस कोसळला, तर अनेक ले-आऊट पाण्याखाली जाण्याची भीती आहे.२०१२-१३ दरम्यान पावसाळ्यातील पूर स्थितीत हा अनुभव आला. त्यामुळे नगर रचना विभाग नदी, नाल्या काठावरील ले-आऊटला परवानगी देतात तरी कशी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शहरातील अनेक ले-आऊटमधील ओपन स्पेसमध्ये आबालवृद्धांना विरंगुळा म्हणून बगीच्याची निर्मिती करण्यात आली नाही. त्यामुळे बच्चेकंपनीलाही खेळण्यासाठी मैदान उपलब्ध नाही. अनेक ले-आऊटमध्ये धड रस्ते नाही. ले-आऊटधारकांनी केवळ माती ओढून रस्त्यांची निर्मिती केली. मात्र प्लॉट विकण्यासाठी ग्राहकांना विविध प्रकारची आमिषे दाखविण्यात आली.मूलभूत सुविधांची वानवाले-आएटमध्ये वीज, पाणी, पक्के रस्ते, विकसित नाही. सर्व अटी व नियमांना बगल देऊन ले-आऊटधारक शासन व ग्राहकांची दिशाभूल करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
ले-आऊटमध्ये सुविधांचा अभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2019 5:00 AM
महागावात अनेक ले-आऊटमध्ये कोणत्याच नागरी सुविधा नाही. तरीही त्यांची दुकानदारी थाटात सुरू आहे. अनेक भागात नदी, नाल्याकाठी ले-आऊट निर्मिती करण्यात आली. मात्र निसर्गाचा समतोल बिघडला व जादा पाऊस कोसळला, तर अनेक ले-आऊट पाण्याखाली जाण्याची भीती आहे.
ठळक मुद्देमहागाव तालुका : रेडझोनमध्ये तटरक्षक भिंत नाही