शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: पंचवटी एक्स्प्रेसला कसाऱ्यात अपघात; दोन डबे झाले वेगळे
2
आम्ही १३ तारखेपर्यंत सरकारवर आशा ठेवून आहोत, नंतर...; मनोज जरांगे नक्की काय म्हणाले?
3
"BMCने गैरसमजातून तक्रार केली होती"; शिंदेसेनेचे खासदार रवींद्र वायकरांना मुंबई पोलिसांकडून क्लीन चिट
4
केंद्रातील सरकार ऑगस्टपर्यंत कोसळेल, तयारीला लागा; INDIA आघाडीतील मोठ्या नेत्याचा दावा
5
"भरपाई आणि विम्यात फरक असतो"; हुतात्मा अग्निवीरांना मदत मिळाली नसल्याचा राहुल गांधींचा पुन्हा आरोप
6
गॅरेजमधून झालेली सुरुवात, आज आहे जगातील सर्वात मोठी रिटेलर; पाहा Amazon च्या यशाची कहाणी
7
प्रेग्नेंसीच्या चर्चेवर अखेर सोनाक्षी सिन्हानं सोडलं मौन, म्हणाली - "आता हॉस्पिटलला..."
8
...आता पेपर फोडला तर होईल एक कोटींचा दंड अन् १० वर्ष कैद; विधानसभेत विधेयक सादर
9
"काही दिवसांपूर्वी स्वामींच्या तारकात झळकण्याची संधी मिळाली तेव्हाच..."; भाग्यश्री मोटेचा अनुभव
10
Rohit Sharmaचं घर आहे जगातील ५० हायराईज टॉवरपैकी एकात; किती आहे किंमत, काय आहेत वैशिष्ट्ये
11
Hathras Stampede : १२१ भाविकांच्या मृत्यूवर पहिल्यांदा बोलले भोले बाबा; म्हणाले, "त्या घटनेनंतर मी..."
12
"माझा बालमित्र लक्षाची खूप आठवण आली...", निवेदिता सराफ यांनी अभिनय बेर्डेचं केलं कौतुक, पोस्ट चर्चेत
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: चंचल मनःस्थितीमुळे हाती आलेली संधी गमावून बसाल!
14
मंत्र्यांच्या वरदहस्ताने डांबर घोटाळा, बिलातून उकळले कोट्यवधी रुपये; जयंत पाटलांचा आरोप
15
डोंगरामध्ये अडकलेल्या ५ अल्पवयीन मुलांची तब्बल सात तासांनी सुखरूप सुटका
16
मॉम टू बी दीपिका पादुकोणचा साडीत देसी अंदाज, फ्लॉन्ट केला बेबी बंप, चेहऱ्यावर दिसला प्रेग्नेंसी ग्लो
17
श्रेय ज्याचे त्यास द्यावे, एवढे लक्षात ठेवा; शेरोशायरी ऐकवत अजित पवारांचे विरोधकांना चिमटे
18
पोलिस ५ महिन्यांपासून गृहकर्जाच्या प्रतीक्षेत; आणखी किती ताटकळणार?
19
सीबीआय तपासाचा ‘फाेकस’ महाराष्ट्र-बिहार कनेक्शनवर; आठ दिवसांचा मुक्काम
20
ब्रिटनमध्ये चार सौ पार...! भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांना बसला नाराजीचा मोठा फटका

‘वखार’च्या गोदामाला रस्त्याचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2018 10:17 PM

महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाने खासगी गोदाम अधिग्रहित करून धान्य साठविण्याची तयारी सुरू केली. मात्र या गोदामात जाण्यासाठी रस्ताच नसल्याने येथे धान्य घेऊन जाणारे ट्रक मधातच फसतात.

ठळक मुद्देट्रक फसले : उमरखेड येथे खासगी गोदाम अधिग्रहण

लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाने खासगी गोदाम अधिग्रहित करून धान्य साठविण्याची तयारी सुरू केली. मात्र या गोदामात जाण्यासाठी रस्ताच नसल्याने येथे धान्य घेऊन जाणारे ट्रक मधातच फसतात. आता पावसाळ्यात तर या ठिकाणी जाणे कठीण झाले आहे. परिणामी ट्रकमधील शेकडो पोते धान्य ओले होण्याची भीती आहे.यावर्षी नाफेडमार्फत जिल्ह्यात तूर व हरभरा खरेदी मोठ्या प्रमाणात करण्यात आली. गोदाम हाऊसफुल्ल झाल्याने अनेक ठिकाणी खासगी गोदाम वखार महामंडळाने अधिग्रहित केले. उमरखेड येथील सरोज भराडे यांच्या मालकीचे गोदाम २२ मे रोजी अधिग्रहित करण्यात आले. या गोदामाची स्थळ पाहणी उमरखेड तहसीलदारांमार्फत करण्यात आली. त्यावेळी गोदाम मालकाने मुख्य रस्त्यापासून गोदामापर्यंत जाण्यास रस्ता नाही. त्यामुळे अधिग्रहण करू नये, असे पत्र दिले. परंतु वखार महामंडळाने याकडे दुर्लक्ष करीत गोदाम ताब्यात घेतले.यवतमाळ जिल्ह्यात खरेदी केलेली तूर आणि हरभरा येथील गोदामात आणला जात आहे. मुकुटबन, घाटंजी, राळेगाव, यवतमाळ, पुसद, दिग्रस, आर्णी आदी ठिकाणावरून ट्रक धान्य घेऊन येतात. परंतु या गोदामापर्यंत जाण्यासाठी रस्ताच नाही.गोदामापर्यंत मोठ्या प्रमाणात चिखल झाला असून धान्य घेऊन आलेले ट्रक चिखलात फसले. पाऊस सुरू असल्याने ट्रकमधील धान्य खराब होण्याची शक्यता आहे. याबाबत शंकरशीला अ‍ॅग्रो वेअर हाऊसच्या संचालक सरोज भंडारी म्हणाले, वखार महामंडळाला या गोदामासाठी अर्धवट रस्ता असल्याचे कळविले. तरीही जबरदस्तीने गोदाम अधिग्रहित करण्यात आले. पावसाळ्यात होणाऱ्या धान्याच्या नुकसानीस आपण जबाबदार राहणार नाही, असे त्यांनी सांगितले.गोदामामध्ये नाफेडने खरेदी केलेला धान्य माल टाकण्यात येणार आहे. त्याला मुख्य रस्त्यापासून गोदामापर्यंत रस्ता नसल्याचे आणि गोदाम शेतात असल्याचे उमरखेड तहसीलदार, एसडीओ, वखार महामंडळ व नाफेडला कळविले आहे.- ए.एन. डावरेस्टोअर किपर वखार महामंडळ, उमरखेड