शहरं
Join us  
Trending Stories
1
Haryana, Jammu & Kashmir Assembly Election Results 2024 Live: हरयाणात भाजप पुढे, पण काँग्रेस म्हणतेय आमचेच सरकार येणार
2
जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सची मुसंडी, भाजपा मागे; पण हरयाणात कल पूर्णच फिरला!
3
मोठा ट्विस्ट! जम्मू-काश्मीरमध्ये निवडणूक ९० जागांसाठी, पण आमदार ९५ असणार; सत्ता कशी स्थापन करणार?
4
Navratri 2024: नवरात्रीत अनवाणी चालण्याने खरंच लाभ होतो का? वाचा धार्मिक आणि शास्त्रीय कारण!
5
"पती पार्किंगमधून बाईक घेण्यासाठी गेला पण परत आलाच नाही..."; पत्नीने सांगितली आपबिती
6
IRE vs RSA : "हाय हाय यह मजबूरी"; ODI मध्ये बॅटिंग कोचवर आली फिल्डिंगसाठी मैदानात उतरण्याची वेळ!
7
Israel Iran War : मोठं युद्ध सुरू होणार? इराणच्या राष्ट्राध्यक्षांना पुतिन भेटणार, इस्त्रायल विरोधात कारवाईची तयारी
8
Ankita Walawalkar अंकिता वालावलकर लवकरच बांधणार लग्नगाठ, तिचा होणारा नवरादेखील आहे सिनेइंडस्ट्रीतला
9
Navratri 2024: लक्ष्मी मातेने वाहन म्हणून घुबडाची निवड का केली असावी? घुबड दिसणे शुभ की अशुभ? वाचा!
10
"पंतप्रधान मोदींनाही जिलेबी पाठवणार"; विजयाआधीच काँग्रेस कार्यालयात मिठाईचे वाटप सुरु
11
"मला सलमानची बायको व्हायचंय", चाहतीच्या प्रश्नाला अरबाज खानचं हटके उत्तर, म्हणाला...
12
शेअर बाजारानंतर चीन नोकरदारांना शॉक देणार; काय आहे चीनचा 'शॉक २.०'? भारतासह जग दहशतीत
13
अजितदादांना धक्क्यामागून धक्के; शरद पवारांकडे झुकताहेत नेते, लोकसभेनंतर आता विधानसभेलाही शह!
14
वाह क्या बात है! पती-पत्नी एकत्र झाले IPS अधिकारी; जाणून घ्या, नेमकं काय घडलं?
15
Singham Again: मराठमोळ्या लेखकाने लिहिली आहे रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन'ची स्टोरी, म्हणाला, "मुंबईत आल्यावर पहिल्यांदा..."
16
"कुणाला प्रयोग करायचा असेल तर..."; झिरवाळांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर; म्हणाले, "जे बोलतात त्यांना..."
17
आजचे राशीभविष्य ८ ऑक्टोबर २०२४; प्रत्येक कार्यात यश मिळण्याची शक्यता
18
कंगना रणौत वादग्रस्त वक्तव्यावरून पुन्हा अडचणीत; कोर्टाने बजावली नोटीस, द्यावं लागणार उत्तर
19
बारामतीनंतर इंदापूरमध्येही मलिदा गँग: शरद पवार; हर्षवर्धन पाटील यांचा शरद पवार गटात प्रवेश
20
जम्मू-काश्मीर, हरयाणाचा आज फैसला, विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी जय्यत तयारी

अल्पभूधारक शेतकरी मृत्यूनंतरही ठरला लोकोपयोगी

By admin | Published: January 14, 2017 1:52 AM

शेतकऱ्याचे अख्खे आयुष्य समाजासाठी अन्न पिकविण्यातच खर्ची पडते. आयुष्यभर तो हाडाची काडं करीत राहातो.

गोडे ठरले नावाप्रमाणे पुरुषोत्तम : प्रत्यक्ष अवयदानाच्या प्रक्रियेची बाभूळगावातील पहिली घटना आरिफ अली ल्ल बाभूळगाव शेतकऱ्याचे अख्खे आयुष्य समाजासाठी अन्न पिकविण्यातच खर्ची पडते. आयुष्यभर तो हाडाची काडं करीत राहातो. तालुक्यातील एका अल्पभूधारक शेतकऱ्याने परोपकाराचा हा प्रवास आणखी एक पाऊल पुढे नेला आहे. या शेतकऱ्याचा बुधवारी मृत्यू झाला. पण जगातून जाता-जाता त्याने आपले अवयव दान करून जगाला कृषीवलांच्या दातृत्वाचा नवा परिचय करून दिला. सत्कर्माला शोभणारेच त्याचे नावही पुरुषोत्तम गोडे! तालुक्यातील सारफळी येथील पुरुषोत्तम वासुदेवराव गोडे (४५) सोयाबीन ट्रॅक्टरमध्ये भरून धामणगावकडे जात होते. त्यावेळी ट्रॅक्टरवरून पडून गंभीर जखमी झाले. त्यांना बाभूळगाव, यवतमाळ व पुढे सावंगी मेघे येथे हलविण्यात आले. ११ जानेवारीला त्यांचा मृत्यू झाला. जनतेची कामे घेऊन बाभूळगावात येणारा, सरकारी कार्यालयात पोटतिडकीने खेडूतांच्या समस्या अधिकाऱ्यांसमोर मांडणारा पुरुषोत्तम आता या जगात नाही. ही माहिती जेव्हा डॉक्टरांनी पुरुषोत्तमची पत्नी प्रितीला दिली, तेव्हा तिने हंबरडाच फोडला. मात्र काही क्षणातच तिने स्वत:ला सावरले. मृत पुरुषोत्तमचे डोळे, यकृत आणि किडणी दान करण्याचा निर्णय तिने डॉक्टरांना सांगितला. यावेळी प्रितीसोबत सावंगी मेघे येथील रुग्णालयात मृताचे मोठे बंधू भरत गोडे, सतीश सराड, चिंतामण गावंडे, आशीष सराड, पिंटू गावंडे, सासरे विनोद दरणे, जावई प्रमोद खेवले, दीपक राऊत, मोहन वानखडे, सामाजिक कार्यकर्ते लाला गावंडे उपस्थित होते. डॉक्टरांनी अवयव दान करण्यासाठी लागणारी सर्व कागदपत्र तयार केली. त्यावर प्रितीताईने डबडबलेल्या डोळ्यांनी स्वाक्षरी केली. त्यानंतर पुरुषोत्तमचे डोळे, यकृत आणि किडणी काढण्यात आली. प्रक्रिया आटोपल्यावर मृतदेह प्रिती व अन्य नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. गुरुवारी सारफळी येथे शेकडो महिला, पुरुषांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. पुरुषोत्तमच्या मागे पत्नी, एक मुलगा, वृद्ध आईवडील आहे. लहानशा गावातील एका महिलेने आपल्या पतीचे अवयव दान करण्याची परवानगी देणे, ही बाब वेधक आहे.