शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या पुढाऱ्यांचा राग माझ्यावर काढू नका"; अजित पवार ग्रामस्थांशी काय बोलले?
2
शरद पवार गटाचे उमेदवार समजीत घाटगे अंतरवालीत; मनोज जरांगेंची घेतली भेट, २ तास चर्चा
3
शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते काँग्रेसच्या प्रचारात; भाजपच्या बंडखोर महिला नेत्याचा मोठा दावा
4
महायुतीत बंडखोरांचा ३६ चा आकडा, त्यापैकी १९ भाजपाचे; बंड शमले नाहीतर युती-आघाडीला ५० जागांवर फटका
5
धनंजय मुंडे यांच्या २०१९ च्या शपथपत्रात तीन, तर २०२४ मध्ये पाच अपत्यांचा उल्लेख!
6
'इमर्जन्सी' ही प्रोपोगंडा फिल्म आहे का? श्रेयसने विचारलेला कंगनाला प्रश्न! अभिनेत्री म्हणाली-
7
"तू तो गया"! सिली पॉइंटवर Sarfaraz Khan चं रचिन विरुद्ध 'स्लेजिंग'; व्हिडिओ व्हायरल
8
८ नोव्हेंबरपासून 'या' कंपनीचा IPO खुला होणार; प्राईज बँड ₹२४, परदेशात आहेत कंपनीचे ग्राहक
9
“मनोज जरांगेंच्या रुपात देशाला आधुनिक गांधी, आंबेडकर, मौलाना आझाद मिळाले”; कुणी केले कौतुक?
10
कर्नाटक आर्थिक संकटात! जेवढी द्यायची ऐपत, तेवढीच आश्वासने द्या...; खर्गेंनी महाराष्ट्रावरून नेत्यांचे कान टोचले
11
नेत्रदिपक भरारी! मेडिकलचं करिअर सोडलं, काहीतरी मोठं करायचं ठरवलं; झाली अधिकारी
12
"मी ठासून सांगतोय माघार घेणार नाही"; वर्षा बंगल्यावरील भेटीनंतर सरवणकरांची स्पष्ट भूमिका
13
Maharashtra Election 2024: महाविकास आघाडीचा गेम बिघडवणार?; ११ बंडखोर कोण आहेत?
14
अमिषा पटेलनं का नाकारला होता शाहरुख खानचा 'चलते चलते'?, अभिनेत्री म्हणाली - "मला..."
15
पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या अध्यक्षांचे निधन; मोदींकडून शोक व्यक्त
16
तरुणीचा व्हिडीओ कॉल उचलला आणि हनिट्रॅपमध्ये अडकले मंत्री, त्यानंतर घडलं असं काही...
17
Video - "RC, ड्रायव्हिंग लायसन्सची गरज नाही, पकडलं तर फक्त भाजपाची डायरी दाखवा, पोलीस..."
18
Gautam Adani News : अदानींनी नेमकं केलंय तरी काय? 'या' कंपनीच्या मागे का लागल्यात PNB, ICICI सारख्या बँका?
19
'सुंदर' चेंडू अन् 'कॉपी पेस्ट फॉर्म्युला'! टॉम लॅथमसह रचिन झाला क्लीन बोल्ड (VIDEO)
20
कार्तिक आर्यन-विद्या बालनचा 'भूल भूलैय्या ३' कसा आहे? पहिला Review आला समोर

तेंडोळीत महिलांची दारूवर धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2018 9:41 PM

तालुक्यातील तेंडोळी येथील महिलांनी दारूबंदीसाठी एल्गार पुकारला असून गावातील दारू विक्रेत्यावर धाड टाकून एक ड्रम गावठी दारूसह सहा ड्रम मोहा माच जप्त करण्यात आला. पसार दारू विक्रेत्याला अवघ्या काही वेळातच आर्णी पोलिसांनी शोधून अटक केली.

ठळक मुद्देविक्रेता पोलिसांच्या ताब्यात : सहा ड्रम मोहा माचासह दारू जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : तालुक्यातील तेंडोळी येथील महिलांनी दारूबंदीसाठी एल्गार पुकारला असून गावातील दारू विक्रेत्यावर धाड टाकून एक ड्रम गावठी दारूसह सहा ड्रम मोहा माच जप्त करण्यात आला. पसार दारू विक्रेत्याला अवघ्या काही वेळातच आर्णी पोलिसांनी शोधून अटक केली.तेंडोळी गावात मोठ्या प्रमाणात दारू विकली जात होती. त्यामुळे महिला त्रस्त झाल्या होत्या. दारूबंदी व्यसनमुक्त आंदोलन समितीच्या पदाधिकारी सुमित्रा जाधव व गावातील महिलांनी दारू विक्रेता गणेश राठोड यांच्या घरी धाड मारली. त्यावेळी एक ड्रम गावठी दारू आणि मोहा फुलाचा माच आढळून आला. त्यानंतर लगेच बोरगाव येथे धाड मारून सहा ड्रम मोहा मोच जप्त करण्यात आला. तेथे विजय राठोड यांच्या घराची झडती घेण्यात आली. दारू विक्रेता मात्र पसार झाला होता. आर्णी पोलिसांनी तत्काळ कारवाई करून त्याला ताब्यात घेतले. यावेळी बोरगाव दारूबंदी व्यसनमुक्तीच्या सीताबाई चव्हाण व महिला उपस्थित होत्या. आर्णी तालुक्यात दारूबंदीसाठी मायाताई मानकर, गोपाबाई राठोड, प्रेमिला शहारे, सुशीला हटवारे, वंदना शिंदे, शेवंता नारनवरे, लिला भुरे, आशा मानकर, रेणुका राठोड, प्रवीण भरणे प्रयत्न करीत आहेत. त्यांना लिलाधर दहीकर, जितेश राठोड, किशोर अरसोड, सतीश जीवने, राजू मोगरे, अक्षय खोब्रागडे मदत करीत आहे.