शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
2
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
3
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
4
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
5
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
6
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
7
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
8
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
9
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
10
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
11
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
12
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
13
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
14
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
15
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
16
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
17
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
18
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
19
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
20
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?

गीताई केंद्रावर भूमाफियांचा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 10:05 PM

वाशिम रोडवरील गीताई केंद्रावर भूमाफीयांनी हल्ला करून सेवकांना मारहाण केली. ही घटना सोमवारी सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देपुसदची घटना : पोलिसात तक्रार, हल्लेखोरांवर अद्याप कारवाई नाही

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : वाशिम रोडवरील गीताई केंद्रावर भूमाफीयांनी हल्ला करून सेवकांना मारहाण केली. ही घटना सोमवारी सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास घडली.वाशिम मार्गावर शिवाजी शाळेलगत विठाबाई मारोतराव ट्रस्टतर्फे गीताई सेवा केंद्राच्या माध्यमातून जनसेवेचे कार्य सुरू आहे. मातोश्री विठाबाई मारोतराव वानखेडे यांनी सदर १.४१ हेक्टर जागा आचार्य विनोबा भावे यांच्या गीताई केंद्राला १९७८ मध्ये दान दिली आहे. सध्या या परिसरात संस्थेचे अध्यक्ष रामभाऊ म्हसकर, मॅनेजिंग ट्रस्टी नारायणराव सांगोलकर, वृंदाताई जाधव, संदीप जाधव वास्तव्याला आहे. या परिसरातील काही जमीन शेतीसाठी आरक्षित आहे. सोमवारी रामकृष्ण वानखेडे, राजेश मल्हारी साळुंखे व सुभाष बापुराव पाध्ये हे इतर ३० ते ४० जणांसह तेथे पोहोचले. त्यांनी ट्रॅक्टरमध्ये फावडे, सिमेंट खांब, दगड, लोखंडी रॉड आदी साहित्य आणून बळजबरीने परिसरात घुसण्याचा प्रयत्न केला. त्याला संदीप जाधव, रामभाऊ म्हसकर आणि अ‍ॅड.ज्ञानेंद्र कुशवाह यांनी विरोध केला. मात्र हल्लेखोरांनी संदीप जाधवला मारहाण करून गीताई केंद्रामध्ये स्वत:च्या मालकीचा फलक लावला. जवळपास दीड तास हा प्रकार सुरू होता. यावेळी काही पोलीसही तेथे उपस्थित होते. मात्र त्यांनी हल्लेखोरांवर कोणतीही कारवाई केली नाही. या प्रकरणी रामभाऊ म्हसकर यांनी त्याच दिवशी पोलिसात तक्रार दिली. मात्र वसंतनगर पोलिसांनी ती एनसीमध्ये ठेवली. संदीप जाधव यांची तक्रार दोन दिवस घेतलीच नाही. नंतर ती १० जानेवारीला स्वीकारण्यात आली. मात्र तीसुद्धा अदखलपात्र म्हणून नोंदविण्यात आली.गेल्या ४० वर्षांपासून ही जागा संस्थेच्या नावाने आहे. सरकारी दस्तवेजात ती संस्थेच्या मालकीची आहे. ट्रस्टकडे पुरावे असूनही कारवाई होत नसल्याचा आरोप म्हसकर, कुशवाह, जाधव यांनी केला.गीताई परिसर हा समाजाची विरासत आहे. आमच्यावर अन्याय होत असून अतिक्रमण हटवावे. न्यायालयाचा आणि कोणताही आधार नसताना ट्रस्टच्या नावे मालकीच्या जागेत कुठेही पाटी लावून बळजबरीने अतिक्रमण करण्याचा प्रयत्न सुरू आहे.- रामभाऊ म्हसकरअध्यक्ष,विठाबाई मारोतराव ट्रस्ट पुसदगीताई केंद्रात घुसून हल्लेखोर जमिनीवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करीत आहे. लोकशाही जागृत न झाल्यास दहशत निर्माण करणाºयांची हिम्मत वाढेल.- नारायणराव सांगोलकरमॅनेजिंग डायरेक्टर,गीताई केंद्र, पुसद