शहरं
Join us  
Trending Stories
1
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
2
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
3
राज ठाकरेंना उत्तर देण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी रश्मी ठाकरेंना विचारले होते का? नितेश राणेंचा सवाल
4
'आम्ही सर्वोच्च न्यायालयाचा आदर करतो, पण...' रामदास आठवलेंचे मोठे वक्तव्य
5
रेशनकार्डधारकांना KYC करण्याची अंतिम मुदत; यानंतर हटवलं जाणार नाव; मोबाईलवरुन करा प्रोसेस
6
LIC नं 'या' बँकेचे खरेदी केले १०.४५ कोटी शेअर्स, किंमत ₹२५० पेक्षाही कमी; आता गुंतवणूकदारांच्या उड्या
7
सलग पाचव्या दिवशी बाजारात तेजी; निफ्टी बँक विक्रमी उच्चांकावर, कोणत्या शेअर्समध्ये घसरण?
8
LPG गॅस सिलिंडरची घरपोच डिलिव्हरी होणार नाही, वितरक संपावर जाणार; कारण काय?
9
हद्दच झाली...! मित्रांनी नवरा-नवरीला निळा ड्रम गिफ्ट केला; दहशतीत असलेले सगळे वऱ्हाडी पाहू लागले
10
कितीही उत्पन्न असलं तरी श्रीमंती येणार नाही; जोपर्यंत बचतीचे 'हे' सूत्र वापरणार नाही
11
तुम्हीही रात्री भात खात असाल तर आताच थांबा; आरोग्याला बसू शकतो मोठा फटका
12
"मी लॉरेन्स बिश्नोईचा माणूस, तुला गोळी घालेन", रुबीना दिलेकच्या नवऱ्याला जीवे मारण्याची धमकी
13
व्यापारयुद्ध, चीन...भारतासाठी जेडी व्हेन्स यांचा दौरा महत्वाचा; पीएम मोदी कोणते मु्द्दे मांडणार?
14
Vastu Tips: घरात मनी प्लांट आहे पण आर्थिक लाभ होत नाही? नक्कीच होत आहेत 'या' चुका!
15
साईचरणी ७५ लाखांचा सुवर्ण मुकुट अर्पण; कुटुंबाकडून ओळख गुप्त ठेवण्याची विनंती
16
गायीच्या शेणात असं काय खास आहे? जे खरेदी करण्यासाठी अरब देशांनी लावल्या रांगा
17
Karnataka Murder: 'आई आणि बहीण रोज वडिलांशी भांडायची, जीवे मारण्याची दिलेली धमकी'; मुलाचा मोठा दावा
18
Rishabh Pant चं नशीब फळफळलं!! आधी २७ कोटींची बोली, आता BCCIच्या करारतही मिळाली बढती
19
Vastu Tips: आपल्या वास्तूची दृष्ट कधी व कशाने काढावी? त्यामागे शास्त्र काय? जाणून घ्या!
20
Pope Francis: किती श्रीमंत होते पोप फ्रान्सिस, आपल्या मागे किती सोडली त्यांनी संपत्ती?

दिग्रसमध्ये जमीन घोटाळा; एसआयटी चौकशी होणार; नगरपरिषदेचे तत्कालीन सीओ टाले यांचे निलंबन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 12:00 IST

दिग्रस नगरपरिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी शेषराव टाले यांना तत्काळ निलंबित करण्यात येत असल्याची घोषणाही त्यांनी केली. 

मुंबई : यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस शहरातील जमिनीच्या महाघोटाळ्याचा पर्दाफाश सोमवारी विधानसभेत झाला. या प्रकरणी नगरविकास, गृह व महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असलेली एसआयटी स्थापन केली जाईल व तीन महिन्यांत त्या आधारे कारवाई केली जाईल, अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात केली. दिग्रस नगरपरिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी शेषराव टाले यांना तत्काळ निलंबित करण्यात येत असल्याची घोषणाही त्यांनी केली. 

शिंदेसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी या प्रकरणी लक्षवेधी सूचना मांडली होती. सर्व कायदे, नियम धाब्यावर बसवून हा घोटाळा करण्यात आला. क्रीडांगण, रस्त्यांसाठी विकास आराखड्यात राखीव असलेल्या जागांवर लेआऊट टाकून संजय बंग आणि इतर १८ विकासकांनी सर्रास भूखंडांची विक्री केली. शेषराव टाले त्यात सामील होते असा हल्लाबोल त्यांनी केला. जमीन अकृषक न करता विकणे, आरक्षण बदलणे, रेल्वेने महसूल विभागाला परत केलेल्या जमिनीवर लेआऊट टाकणे असे प्रकार घडले असल्याचे ते म्हणाले. 

यावर मंत्री बावनकुळे म्हणाले की,  दिग्रसमध्ये अक्षरश: धुमाकूळ घातला गेला. खूप बदमाशा करण्यात आल्या. यात महसूलचे अधिकारी सामील होते का याचीही चौकशी एसआयटीमार्फत केली जाईल. मात्र, ज्येष्ठ सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी तत्कालीन मुख्याधिकारी टाले यांच्या निलंबनाची मागणी केली. त्यावर, निलंबनाचा आदेश आजच काढला जाईल, सरकारी सेवेत ठेवण्याच्या लायकीचा हा अधिकारी नाही, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. 

मूर्तिजापूरमध्येही घोटाळे शेषराव टाले पूर्वी मूर्तिजापूरमध्ये होते, तेथेही त्यांनी घोटाळे केले. त्याचीही चौकशी करा, ते शासनाची परवानगी न घेता परदेशात गेले होते. त्यांच्या संपत्तीची चौकशी करा, अशी मागणी भाजपचे मूर्तिजापूरचे आमदार हरीष पिंपळे यांनी केली.एसआयटी या प्रकरणीही चौकशी करेल, असे बावनकुळे म्हणाले. संजय बंग व इतर विकासक यांच्या संपत्तीची चौकशी करा ही आमदार संजय गायकवाड यांनी केलेली मागणी बावनकुळे यांनी मान्य केली. 

टॅग्स :YawalयावलChandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळे