ठळक मुद्देअवैध सावकारीतही वापर : रिव्हॉल्वर, वाहने, सोने खरेदी
<p>लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोट्यवधी रुपयांच्या भूखंड घोटाळ्यातील पैसा यवतमाळच्या गुन्हेगारी वर्तुळात वापरला जात असल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे. एका गाजलेल्या खुनातील काही आरोपींसाठी हा पैसा वापरला गेल्याची चर्चा पोलीस वर्तुळातूनच दबक्या आवाजात बाहेर येत आहे.यवतमाळात भूमाफियांचा हैदोस सुरू आहे. दुर्लक्षित भूखंडांचे परस्परच मालक बदलवून त्या प्रॉपर्टी बँकांमध्ये तारण ठेवल्या जात आहे. त्याद्वारे कोट्यवधींच्या रकमा कर्ज म्हणून उचलल्या जात आहे. हाच पैसा गुन्हेगारी जगतात वापरुन गुन्हेगारी टोळ्या आपले वर्चस्व निर्माण करीत आहे. एका बँकेतून उचलल्या गेलेल्या तीन कोटींच्या कर्जामधून गुन्हेगारी वर्तुळातील सदस्यांसाठी महागडी वाहने, अग्नीशस्त्रे (रिव्हॉल्वर), सोन्याचे चेन, कडे, ब्रासलेट आदी खरेदी केले गेल्याचे बोलले जाते. यातीलच पैसा यवतमाळच्या बाजारपेठेत अवैध सावकारीसाठी वापरला गेला आहे.सावकारीचे पुरावे मशीनमध्येतीन कोटी कर्ज मंजूर करणाऱ्या बँकेत एक डीआरडी एजंट आहे. त्याचे नाव वेगळे आणि एजंसी आपल्याच समकक्ष दुसºयाच्या आडनावाने आहे. त्याच्या घरी धाड घातल्यास कोरे स्टॅम्प, बोगस शिक्के, खरेदी खत, बँकेची डीआरडीची मशीन सापडण्याची शक्यता आहे. त्या मशीनमधील डेटा तपासल्यास अवैध सावकारीचे पुरावे त्यात मिळू शकतात.एजंट-अधिकाºयाचे संगनमतसदर एजंट व त्या बँकेतील एक अधिकारी चांगले मित्र आहे. त्यामुळेच त्या बँकेतून गुन्हेगारी वर्तुळातील सदस्यांना सहज कर्ज उपलब्ध होते. तीन कोटींच्या कर्जाचा हा प्लॅनसुद्धा या एजंट व अधिकाºयानेच संयुक्तपणे बनविला.नवख्यांकडे रिपोर्टची जबाबदारीभूखंडाची किंमत (व्हॅल्युएशन) वाढविण्यासाठी डिप्लोमा होल्डर इंजिनिअरकडे तर सर्च रिपोर्टसाठी अशाच एका नवख्या तज्ज्ञाकडे या बँकतून पाठविले जाते. लाभाचे पाट १८९ किलोमीटरपर्यंत वाहत असल्याने वरिष्ठाचा आपल्या या कनिष्ठावर प्रचंड विश्वास आहे. या विश्वासातूनच अशी बोगस कर्ज प्रकरणे मंजूर केली जात आहे.विड्रॉल करणारे बँकेच्या सीसीटीव्हीत कैदउचललेल्या कर्जाचा वापर गुन्हेगारी टोळीच्या सदस्यांसाठीच केला गेला की नाही, याची खातरजमा खालील पद्धतीने करता येईल.गाजलेल्या खुनातील आरोपींना जामीन मिळाला, नेमका त्याच वेळेस तीन कोटींच्या कर्जातील रकमेची उचल झाली काय, त्याच्या तारखा जुळविता येतील.या कर्जाच्या रकमेची विड्रॉल घेण्यासाठी आलेल्या व्यक्तींचे चेहरे सीसीटीव्ही फुटेजमध्ये तपासता येतील.रक्कम एकाच वेळी उचलली गेली का, त्यातून नेमकी कोणत्या ज्वेलर्समधून सोने खरेदी केली गेली, त्याचे बिल आहे का आदी बाबी आरोपींच्या अटकेनंतर तपासल्या जाऊ शकतात.भूमाफियांचा पैसा गुन्हेगारीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 10:00 PM