नरेश मानकर ।लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा: राष्ट्रीय महामार्गावरील करंजी गावापासून जवळच असलेल्या शिख बांधवांनी सुरू केलेली लंगर सेवा लॉकडाऊनच्या काळात असहाय्य नागरिकांसाठी वरदान ठरली असून आतापर्यंत या सेवेत हजारो असहाय्य भुकेल्या नागरिकांनी भूक भागविली आहे.कोरोना या महाभयंकर रोगाचा वाढता प्रभाव लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ मार्चपासून लॉकडाऊनची घोषणा केली. तेव्हापासून देशातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवसाय ठप्प झाले आहेत. राष्ट्रीय महामार्गावरील सर्व हॉटेल्स, ढाबे बंद झाले आहेत. त्यामुळे रस्त्यावरील ट्रकचालक व क्लिनर यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती. त्याचप्रमाणे सर्व उद्योगधंदे, छोटे-मोठे काम, कारखाने ठप्प पडल्यामुळे मजूर वर्गाच्या हातालाही काम राहिले नाही. त्यामुळे परराज्यात गेलेले मजूर व त्यांचे कुटुंबिय हे आपल्या गावी स्थलांतरीत होत आहेत. उत्तरप्रदेश, छत्तीसगड येथील तेलंगणात गेलेले असंख्य मजूर आपल्या गावाकडे स्थलांतरीत होत आहे. दररोज हैद्राबाद-नागपूर या राष्ट्रीय महामार्गाने हजारो किलोमीटरचे अंतर पायदळ जाणाऱ्यांचे हे दृश्य हृदय पिळवटून टाकणारे आहे. भुकेल्या पोटाने पायदळ जाणाऱ्या या मजूर बांधवांना मार्गातील अनेकजण आपल्यापरीने मदत करित आहे. परंतु अनेकदा त्यांना कुठेही मदत मिळत नाही. अशा परिस्थितीत तालुक्यातील करंजी या गावाजवळ शिख बांधवांचा कार सेवा डेरा त्यांच्या मदतीला धावून आला. राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या कार सेवा डेराच्या लंगर सेवेत या रस्त्याने जाणाºया-येणाºया भुकेल्या असहाय्य नागरिकांना पोटभर जेवण दिल्या जाते. या लंगर सेवेत भोजन केलेला प्रत्येकजण शिख बांधवांच्या या सेवेला सलाम केल्याशिवाय राहत नाही. केवळ त्यांच्या पोटाचीच सोय नाही, तर त्यांच्या आंघोळीचीसुद्धा याठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. विशेष म्हणजे सामाजिक अंतर ठेऊन कोणतेही नियम न मोडता शिख बांधवांची ही सेवा २४ तास अखंडपणे सुरू आहे.सेवेकऱ्यांकडून मानवतेचे दर्शनकोणत्याही प्रकारची प्रसिद्धी न करता, कोणताही बडेजाव न करता माणुसकी जपणारी ही शिख बांधवांची दिवस-रात्रं सुरू असलेली सेवा निश्चितच वाखाणण्याजोगी आहे. त्यांची ही सेवा पाहून अनेक दानशूर नागरिकांकडून शिख बांधवांच्या या सेवेसाठी धान्याची व इतर आवश्यक वस्तूंची मदत मिळत आहे. तालुका वकील संघटनेनेदेखिल या सामाजिक कार्यासाठी किराणा सामानाची व इतर वस्तूंची मोठ्या प्रमाणावर मदत केली.या सेवेतून आपल्याला वेगळाच आनंद मिळतो - खैरा बाबाजीवन हे क्षणभंगूर आहे. आपण आज आहोत, उद्या नाही. परंतु जेवढे दिवस राहायचे आहे, तेवढे आनंदाने जगावे. दुसºयाच्या आनंदात आपला आनंद पाहावा. असहाय्य लोकांची सेवा, भुकेल्यांना अन्न ही गुरू नानकांची शिकवण होती. त्यांची शिकवण आचरणात आणण्याचा आम्ही प्रयत्न करतो. भुकेल्यांना अन्नदान करून आपल्याला आनंद मिळतो, अशी प्रतिक्रीया कारसेवा डेरा प्रमुख खैरा बाबा यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.
शिख बांधवांची ‘लंगर सेवा’ वाटसरूंसाठी वरदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2020 5:00 AM
परराज्यात गेलेले मजूर व त्यांचे कुटुंबिय हे आपल्या गावी स्थलांतरीत होत आहेत. उत्तरप्रदेश, छत्तीसगड येथील तेलंगणात गेलेले असंख्य मजूर आपल्या गावाकडे स्थलांतरीत होत आहे. दररोज हैद्राबाद-नागपूर या राष्ट्रीय महामार्गाने हजारो किलोमीटरचे अंतर पायदळ जाणाऱ्यांचे हे दृश्य हृदय पिळवटून टाकणारे आहे.
ठळक मुद्देनिराधार भुकेल्यांना मिळतेयं पोटभर अन्न, २४ तास सुरू आहे अखंड सेवा, स्थलांतरीतांनाही लाभ