शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

जिजामाता कन्या शाळा मोजतेय अखेरची घटका

By admin | Published: February 26, 2017 1:14 AM

स्त्री शिक्षणाचा सात दशकांपासून पुसद शहरात अविरत प्रसार करणाऱ्या येथील जिजामाता माध्यमिक कन्या शाळा आता अखेरच्या घटका मोजत आहे.

पटसंख्येला ओहोटी : सात दशकांची साक्षीदार शाळा दुर्लक्षित पुसद : स्त्री शिक्षणाचा सात दशकांपासून पुसद शहरात अविरत प्रसार करणाऱ्या येथील जिजामाता माध्यमिक कन्या शाळा आता अखेरच्या घटका मोजत आहे. प्रशस्त इमारत आणि सर्व सुविधा असतानाही जिल्हा परिषदेच्या दुर्लक्षित धोरणामुळे या शाळेकडे मुलींनी पाठ फिरविली आहे. एके काळी ७०० च्या आसपास असणारी पटसंख्या आता अवघ्या १८० वर आली आहे. पुसदच्या स्त्री शिक्षणाची गंगोत्री विविध समस्यांच्या विळख्यात सापडली आहे. पुसद येथे १९४८ साली जिल्हा परिषद (माजी शासकीय) माध्यमिक कन्या शाळेची स्थापना झाली. जिल्ह्यातील मोजक्या शाळेतील ही आदर्श अशी शाळा आहे. पाचवी ते दहावीपर्यंत या ठिकाणी मुलींना शिक्षण दिले जाते. शहराच्या मध्यभागी प्रशस्त जागेवर ही शाळा आहे. या शाळेत १६ वर्गखोल्या, एक हॉल, एक आॅफीस, लिपीक आॅफीस यासह जीवशास्त्र, भौतिक शास्त्राची प्रयोगशाळा आणि संगणक कक्षही आहे. पुसद शहरातील शेकडो मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे महत्वपूर्ण कार्य या शाळेने केले आहे. परंतु अलिकडे खासगी शाळांचे पेव फुटले आणि पटसंख्या घटू लागली. पूर्वी या शाळेत शहरातील गरीब-श्रीमंतांच्या मुली शिकत होत्या. त्यावेळी ७०० च्या आसपास पटसंख्या असायची. एका-एका वर्गाच्या दोन-दोन तुकड्या असायच्या. परंतु आता या शाळेची पटसंख्या १८० वर येऊन ठेपली आहे. पूर्वी येथे शिक्षकांची संख्याही मोठी असायची परंतु आता केवळ नऊ शिक्षक येथे ज्ञानदाचे कार्य करीत आहे. श्रीमंतांनी तर या शाळेकडे पाठ फिरविली. मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील मुली येथे शिक्षण घेतात. या ठिकाणी असलेले शिक्षक पटसंख्या टिकविण्यासाठी विविध उपक्रम राबवितात. परंतु पालक प्रतिसाद देत नाहीत. शाळेच्या प्रशस्त इमारतीला बकाल स्वरूप आले आहे. एका बाजुचे छत कोसळले असून, त्याची अद्यापही डागडुजी केली नाही. शाळेच्या विस्तीर्ण मैदानाचीही अवस्था वाईट आहे. रात्रीच्यावेळी या परिसराचा उपयोग महिला हागणदारीसाठी करतात. दिवसभर शाळेच्या मैदानात मोकाट जनावरे आणि डुकरांचा सुळसुळाट झालेला असतो. जिल्हा परिषदेच्या अधिपत्याखाली असलेल्या या शाळेलगतच विविध शासकीय कार्यालये आणि अधिकाऱ्यांची निवासस्थाने आहेत परंतु कुणीही याकडे लक्ष देत नाही. पुसद उपविभागीय अधिकाऱ्यांचे निवासस्थान या शाळेलगत आहे. उपविभागीय अधिकारी नवलकिशोर राम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी झाले होते. त्यांनी या शाळेची दुरावस्था अगदी जवळून बघितली. परंतु जिल्हा परिषदेत गेल्यानंतर या शाळेच्या विकासासाठी कोणत्याही उपाययोजना केल्या नसल्याचे पालक सांगतात. शिक्षणाची गंगोत्री असलेल्या या शाळेच्या विकासासाठी आता पुसदकरांनी पुढाकार घ्यावा अशी मागणी होत आहे. (कार्यालय चमू)