लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सूपर स्पेशालिटी हॉस्पिटल साकरत असून इमारतीचा पहिला टप्पा पूर्णत्वास आला आहे. आता रुग्णांच्या चाचण्यासाठी आवश्यक मशीनरी येण्यास प्रारंभ आहे. त्यातील मेमोग्राफी मशीन प्राप्त झाली असून विदर्भात पहिल्यांदाच यवतमाळ मेडिकलला मिळाली आहे.ग्रामीण भागात स्तनकॅन्सरचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येतात. मात्र निदान करणारी महागडी मेमोग्राफी मशीन विदर्भात एकाही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नाही. त्यामुळे गोरगरिब रुग्णांची गैरसोय होत होती. आता एक कोटी ३० लाख रुपयांची मेमोग्राफी मशीन यवतमाळात दाखल झाली आहे. याशिवाय इसीजी, एमआयआर, सिटीस्कॅन या अॅटोमॅटीक व अद्ययावत मशीनरी आल्या आहेत. थेट दिल्ली येथील आयुर्विज्ञान परिषदेच्या स्तरावरून स्पेशालिटीच्या मशीनरी खरेदी प्रक्रिया केली जात आहे. एका पाठोपाठ एक अशा महत्वपूर्ण मशनरी रुग्णालयासाठी येत आहे. मेमोग्राफी मशीन व इसीजी वापरात काढण्यात आली असून स्थानिक टेक्निशियनला प्रशिक्षण दिले जाणार आहे. काही मशनरी ठेवण्यासाठी जागाच नसल्याने इमारत पूर्ण होईपर्यंत परत पाठवाव्या लागल्या आहे. मात्र जागा उपलब्ध होताच त्या परत आणल्या जातील.यवतमाळच्या वैद्यकीय महाविद्यालयात सूपर स्पेशालिटी साकारत असल्याने त्याचा फायदा यवतमाळसह लगतच्या जिल्ह्यांनाही होणार आहे.स्थानिक टेक्नीशियनला प्रशिक्षण देणारअधिष्ठाता डॉ. मनिष श्रीगिरीवार यांनी मेमोग्राफी मशीन तात्पुरती अधिष्ठाता कार्यालयालगतच्या जागेत सुरू करण्याचे निर्देश दिले आहे. शिवाय इसीजी मशीनचाही वापर केला जात आहे. केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाने लवकरच स्पेशालिटीच्या इमारतीचा तळमजला पूर्ण होणार असल्याचे सांगितले. यासर्व मशीनरी तळमजल्यावर लावल्या जाणार आहे. यामध्ये १.५ टेक्झाम असलेली एमआरआय मशीन, डिजीटल स्लाईड असलेला सिटीस्कॅन यांचा समावेश आहे. या मशनरी पुरवठादार कंपनीच्या अभियंत्यांकडून इंस्टॉल केल्यानंतर त्या वापराबाबतचे प्रशिक्षण स्थानिक टेक्निशियनला दिले जाणार आहे. काही आठवड्यातच या मशीनरी रुग्णांच्या सेवेत रूजू होणार आहे. त्यासाठी मेडीकल प्रशासनाकडून पाठपुरावा सुरू असल्याचे डॉ. श्रीगिरीवार यांनी सांगितले.
‘मेडिकल’मध्ये अद्ययावत मशीनरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2018 9:57 PM
येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सूपर स्पेशालिटी हॉस्पिटल साकरत असून इमारतीचा पहिला टप्पा पूर्णत्वास आला आहे. आता रुग्णांच्या चाचण्यासाठी आवश्यक मशीनरी येण्यास प्रारंभ आहे. त्यातील मेमोग्राफी मशीन प्राप्त झाली असून विदर्भात पहिल्यांदाच यवतमाळ मेडिकलला मिळाली आहे.
ठळक मुद्देसुपर स्पेशालिटी : मेमोग्राफी मशीन प्राप्त, जुलैपर्यंत साकारणार इमारत