मान्यवरांची उपस्थिती : आर्णी व लोहारा एमआयडीसीतील उपकेंद्रयवतमाळ : जिल्ह्यात विविध योजनेअंतर्गत पूर्ण झालेल्या महापारेषण कंपनीचे दोन व महावितरण कंपनीच्या १५ उपकेंद्राचे लोकार्पण तथा प्रस्तावित महापारेषण कंपनीच्या एक व महावितरण कंपनीच्या सात उपकेंद्राच्या कामाचा शुभारंभ राज्याचे ऊर्जा व राज्य उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते सोमवार, २४ एप्रिल रोजी होणार आहे. महापारेषणच्या १३२ केव्ही उपकेंद्र आर्णी व एमआयडीसी लोहाराचे लोकार्पण व २२० केव्ही नेर (रेणुकापूर) उपकेंद्राचे भूमिपूजन सोमवारी सकाळी साडेआठ वाजता एमआयडीसी लोहारा येथे होईल. महावितरणच्या विविध योजनेअंतर्गत पूर्ण झालेल्या ३३/११ केव्ही उपकेंद्राचे लोकार्पण व दिनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजना व एकात्मिक विकास कार्यक्रमाअंतर्गत प्रस्तावित उपकेंद्राचे भूमिपूजन अधिक्षक अभियंता, विद्युत भवन, आर्णी रोड, यवतमाळ यांच्या प्रांगणात सकाळी साडेनऊ वाजता पार पडणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर हे उपस्थित राहतील. तर प्रमुख पाहुणे म्हणून विधान परिषद उपसभापती माणिकराव ठाकरे राहतील. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा ऊर्जा राज्यमंत्री मदन येरावार, राज्यमंत्री संजय राठोड, गृह राज्यमंत्री (शहरे) रणजित पाटील, वसंतराव नाईक स्वावलंबन मिशन महामंडळाचे अध्यक्ष किशोर तिवारी, जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरी आडे, रामुजी पवार आदींसह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची उपस्थिती राहणार आहे. (प्रतिनिधी)विजेसंदर्भात नागरिकांशी थेट संवादयावेळी ऊर्जा राज्यमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे नागरिक व लोकप्रतिनिधींसोबत थेट संवाद साधणार आहेत. अधिक्षक अभियंता कार्यालय, आर्णी रोड यवतमाळ येथे सकाळी ११ ते दुपारी एक वाजेपर्यंत आयोजित कार्यक्रमात नागरिक तसेच सर्वपक्षिय पदाधिकारी यांच्याकडून तक्रारी, सूचना व निवेदने ते स्वीकारतील व त्यांचे निराकरण करतील. या कार्यक्रमात नागरिकांनी आपल्या सूचना व निवेदने लेखी स्वरुपात द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. दुपारी अडीच वाजता विश्राम भवन येथे लोकप्रतिनिधींसोबत बैठक व चर्चा आयोजित करण्यात आली आहे.
वीज उपकेंद्र कामाचा शुभारंभ
By admin | Published: April 24, 2017 12:06 AM