नेर : स्थानिक नगरपरिषदेच्या प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण आणि विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते लोकार्पण आणि भूमिपूजन करण्यात आले. प्रसंगी ‘विकासवाटा’ या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी मंचावर अध्यक्षस्थानी खासदार भावना गवळी होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष पवन जयस्वाल, पंचायत समिती सभापती भरत मसराम, परमानंद अग्रवाल, नामदेव खोब्रागडे, बाजार समिती सभापती रवींद्र राऊत, पंचायत समिती सदस्य मीना खांदवे, भाऊराव ढवळे, बांधकाम सभापती संजय दारव्हटकर, जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड, शिवसेना तालुका प्रमुख गजानन भोकरे, नगरसेविका रश्मी पेटकर, वनिता मिसळे, माया राणे, संध्या चिरडे, विनोद जयसिंगपुरे, शालीक गुल्हाने, उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे, दिवाकर राठोड आदी उपस्थित होते. शेतकरी दुष्काळामुळे होरपळून निघत आहे, याची मला जाणीव आहे. शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ येऊ नये यासाठी दीर्घकालीन उपाययोजना करण्याकडे महाराष्ट्र शासनाचा कल आहे. गावागावात रस्ते, वीज, पाणी या सुविधा उपलब्ध करून देण्याचे आपले ध्येय आहे. वळण रस्ता, २२० केव्हीचे विद्युत केंद्र, शहरात चौकाचौकात सीसीटीव्ही कॅमेरे, वनउद्यान आदी कामे हाती घेतले जाईल, असे ना. संजय राठोड यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले. उपस्थित मान्यवरांनीही समयोचित विचार मांडले. उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे यांनी प्रास्ताविकातून तालुक्यात होत असलेल्या विविध विकास कामांची माहिती दिली. संचालन तिखे यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)
नेर पालिकेच्या इमारतीचे लोकार्पण
By admin | Published: May 25, 2016 12:15 AM