शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

कोर्टात वकील, पक्षकारांचा वेळ वाचणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 11:03 PM

उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार जिल्हा आणि कामगार न्यायालयात ई-कोर्ट प्रणालीचा प्रारंभ करण्यात आला आहे. यामुळे पक्षकारांना आपले प्रकरण कुठल्या स्थितीत आहे, पुढची तारीख केव्हा आहे, याची माहिती क्षणात उपलब्ध होण्यास मोलाची मदत मिळणार आहे. त्याकरिता क्युसेस मशीन न्यायालय परिसरात लावण्यात आली आहे. न्यायालयाचा निकालही या ठिकाणी जाणून घेता येणार आहे.

ठळक मुद्देई-कोर्ट प्रणाली : मशीनवर कळणार आपल्या खटल्याची तारीख व स्थिती

रूपेश उत्तरवार।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार जिल्हा आणि कामगार न्यायालयात ई-कोर्ट प्रणालीचा प्रारंभ करण्यात आला आहे. यामुळे पक्षकारांना आपले प्रकरण कुठल्या स्थितीत आहे, पुढची तारीख केव्हा आहे, याची माहिती क्षणात उपलब्ध होण्यास मोलाची मदत मिळणार आहे. त्याकरिता क्युसेस मशीन न्यायालय परिसरात लावण्यात आली आहे. न्यायालयाचा निकालही या ठिकाणी जाणून घेता येणार आहे.पूर्वी पक्षकाराचा पुढील तारीख कधी आहे आणि प्रकरण कुठल्या स्थितीत पोहोचले आहे याची माहिती मिळविण्यात वेळ खर्ची जात होता. शिवाय तारीख चुकल्यास पडणारा भुर्दंड वेगळाच होता.आता नवीन पध्दतीमुळे पक्षकाराला आपल्या प्रकरणाचा नंबर माहित नसला तरी, नाव टाकताच प्रकरणाची संपूर्ण माहिती स्क्रिनवर दिसणार आहे. यामध्ये आतापर्यंत किती तारखा झाल्या, केस नंबर, पुढील तारीख, प्रकरणाची मागील तारखेस काय स्थिती होती याची संपूर्ण माहिती स्क्रिनवर पाहता येणार आहे. यामुळे ही प्रणाली सर्वांच्या दृष्टीने उपयुक्त ठरणारी आहे. कामकाजाची गती वाढविण्यास मोलाची मदत करणारी ठरणार आहे. यावर संपूर्ण माहिती अपडेट करण्याची जबाबदारी न्यायालयातील कर्मचाऱ्यांवरच टाकण्यात आली आहे.तारखांचे ‘एसएमएस’न्यायालयात दाखल प्रकरणातील तारखांवर पक्षकारांना उपस्थित राहता यावे म्हणून तारखेचे ‘एसएमएस’ पाठविण्याची सुविधा अलिकडच्या काळात विकसित झाली. केस फाईल करताना त्यावर पक्षकारांचा मोबाईल नंबर आवश्यक आहे.आधुनिक मशीन सर्वसामान्यांसाठी खुली करण्यात आली आहे. पक्षकाराने वकिलांना फोन करून माहिती विचारण्याची आवश्कता राहणार आहे. केस कुठे सुरू आहे, न्यायाधीश कोण आहेत, पुढील तारीख कोणती यासह विविध माहिती उपलब्ध होणार आहे. यामुळे न्यायालयात जाणारा वेळ वाचण्यास मदत होणार आहे.- अ‍ॅड. मिनाज मलनसअध्यक्ष, बार कौन्सिल, यवतमाळ