शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
2
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
3
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींची हवा संपली, रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”
4
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
5
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
6
शेअर बाजारातील घसणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल 
7
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
8
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
9
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
11
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
12
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
13
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
14
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
15
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
16
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
17
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
18
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
19
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब

झरीत पट्टेदार वाघीण मृतावस्थेत आढळली

By admin | Published: March 15, 2016 4:17 AM

पांढरकवडा वन विभागांतर्गत झरी तालुक्यात एका पट्टेदार वाघिनीचा कुजलेला मृतदेह सोमवारी सकाळी

झरीजामणी : पांढरकवडा वन विभागांतर्गत झरी तालुक्यात एका पट्टेदार वाघिनीचा कुजलेला मृतदेह सोमवारी सकाळी आढळून आला. या वाघिणीच्या शिकारीची बाब वन खात्याने स्पष्टपणे फेटाळून लावली असली तरी तिच्या मृत्यूमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट न झाल्याने घातपाताची शंका कायम आहे. झरी तालुक्यातील बोपापूरपासून दोन किलोमीटर अंतरावर वन विकास महामंडळाच्या पवनार येथील जंगलात कक्ष क्र. २३ मध्ये पाण्यात वाघिनीचा मृतदेह आढळला. स्वयंसेवी संस्थांचे सुरेश बावणे व राजू देवाळकर हे दोन कार्यकर्ते रविवारी सायंकाळी त्या भागात फिरत असताना त्यांना दुर्गंधी आली. त्यांनी याची कल्पना वन खात्याला दिली. त्यावरून मुकुटबनचे वन परिक्षेत्र अधिकारी रत्नपारखी यांनी रविवारी सकाळपासूनच दुर्गंधी येत असलेल्या दिशेने शोधमोहीम चालविली. तेव्हा एका पट्टेदार वाघिनीचा अर्धाअधिक कुजलेला मृतदेह पाण्यात आढळून आला. सुमारे तीन ते चार दिवसांपूर्वी तिचा मृत्यू झाला असावा असा अंदाज आहे. सव्वा मीटर उंच आणि चार ते साडेचार वर्ष वयाच्या या वाघिनीची नखे, दात, कातडे शाबूत असल्याने शिकारीचा उद्देश नसावा, असे वन अधिकारी दाव्याने सांगत आहे. मात्र तिच्या मृत्यूमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पांढरकवडा येथील उपवनसंरक्षक जी.गुरूप्रसाद (आयएफएस) यांच्या उपस्थितीत सदर वाघिनीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वाघिनीवर शिकारीच्या दृष्टीने विष प्रयोग करण्यात आला का, शेताच्या कुंपनाच्या तारेचा वीज स्पर्श होऊन मृत्यू झाला का, की पाण्यात बुडून मृत्यू झाला या सर्व पैलूंनी वन विभागाची यंत्रणा चौकशी करीत आहे. या वाघिनीचा नैसर्गिक मृत्यू झाला असण्याची शक्यताही वन अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे.दरम्यान घटनास्थळी पशुसंवर्धन विभागाच्या डॉक्टरांनाही पाचारण करण्यात आले. पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.बावणे, डॉ.नाळे, बनसोड, डॉ.देवकर आदींनी वाघीणीच्या मृतदेहाचा पंचनामा केला. या घटनेने वन विभागात एकच खळबळ उडाली आहे. (शहर प्रतिनिधी) पांढरकवडा वन विभागात १० वाघांची नोंद४पांढरकवडा वन विभागांतर्गत विखुरलेल्या संरक्षित जंगलांमध्ये नऊ ते दहा वाघांचे अस्तित्व असल्याची नोंद वन विभागाच्या दप्तरी आहे. व्याघ्र गणनेमध्ये ती वारंवार सिद्ध झाली. या वाघिनीच्या मृत्यूने मात्र या विभागात पट्टेदार वाघांची संख्या घटली आहे. याशिवाय पांढरकवडा तालुक्यातच असलेल्या टिपेश्वर अभयारण्यामध्येसुद्धा १२ ते १६ वाघांचे अस्तित्व आढळून आले आहे. प्रत्यक्षात नोंद मात्र पाच ते सहाच वाघांची आहे. मानवाचे पाच बळी वाघाचा पहिलाच ४पांढरकवडा-वणी विभागांतर्गत वाघाच्या हल्ल्यात आतापर्यंत महिलांसह पाच शेतकरी-शेतमजुरांचा मृत्यू झाला आहे. वाघाने शिकार केलेल्या पाळीव जनावरांची संख्या तर डझनाने आहे. या वाघांची झरी व वणी तालुक्यात सर्वाधिक दहशत पहायला मिळते. अनेक गावकऱ्यांना व्याघ्र दर्शन झाले आहे. त्यामुळे सायंकाळपूर्वीच शेतकरी-शेतमजूर घराची वाट धरतात. पांढरकवडा वन विभागात वाघिनीच्या मृत्यूचे मात्र हे पहिलेच प्रकरण आढळून आले आहे. पट्टेदार वाघिनीच्या मृत्यूचे नेमके कारण शोधले जात आहे. व्हिसेरा तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. शरीराचे सर्व भाग सुस्थितीत असल्याने शिकार नक्कीच नाही. - जी.गुरूप्रसादउपवनसंरक्षक, पांढरकवडा.