शहरं
Join us  
Trending Stories
1
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
2
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
3
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
4
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
5
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
6
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
7
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
8
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
9
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
10
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
11
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
12
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
13
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
14
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
15
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
16
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
17
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
18
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
19
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
20
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत

डिजिटल शाळांना पुढाऱ्यांचा सुरुंग

By admin | Published: March 18, 2016 2:44 AM

लोकसहभागातून डिजिटल शाळा करण्याचे शासनाचे निर्देश आहे. यासाठी काही गावातील शाळांनी पुढाकार घेतला.

कळंब तालुका : नऊपैकी एकाच पदाधिकाऱ्याच्या गावात डिजिटल गजानन अक्कलवार  कळंबलोकसहभागातून डिजिटल शाळा करण्याचे शासनाचे निर्देश आहे. यासाठी काही गावातील शाळांनी पुढाकार घेतला. परंतु पदाधिकाऱ्यांच्या दुर्लक्षित धोरणामुळे त्यांच्याच गावातील शाळा डिजिटल नसल्याचे वास्तव तालुक्यात आहे. लोकसहभाग व लोकवर्गणीतून डिजिटल शाळा करण्यासाठी काही शाळांनी पुढाकार घेतला. जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्यांच्या गावातील शाळा डिजीटल होणे अपेक्षित होते. परंतु तालुक्यातील तीन जिल्हा परिषद व सहा पंचायत समिती सदस्यांच्या गावातील शाळाच डिजिटल झालेल्या नाही. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य प्रवीण देशमुख यांचे सावरगाव हे मूळगाव. त्यांच्या गावातील शाळा डिजिटल होणे क्रमप्राप्त होते. परंतु या गावात डिजिटल शाळा करण्यासाठी कुठल्याही हालचाली झालेल्या नाही. हीच स्थिती कळंबची आहे. या गावात जिल्हा परिषद सदस्य नीलिमा गोहणे व पंचायत समितीचे उपसभापती विजय गेडाम या दोन पदाधिकाऱ्यांचे वास्तव्य आहे. खरे पाहिले तर तालुक्याचे ठिकाण असलेल्या कळंब गावातून डिजिटल शाळेची सुरुवात व्हायला पाहीजे होती. कारण येथून लोकवर्गणी होण्यासाठी मोठा वाव आहे. परंतु या दोन्ही पदाधिकाऱ्यांच्या दुर्लक्षित धोरणामुळे व शिक्षकांच्या अनास्थेमुळे एकही शाळा डिजीटल होण्याच्या मार्गावर नाही. दुसरीकडे मात्र लहान-लहान गावातील शाळांचे मात्र डिजीटलमध्ये कधीचेच रुपांतर झालेले आहे. त्यामुळे या पदाधिकाऱ्यांनी खरे तर आत्मचिंतन करावे, अशीच स्थिती आहे. पंचायत समितीच्या सभापती वर्षा वासेकर यांचे नांझा येथे वास्तव्य आहे. तालुक्यातील मोठ्या गावापैकी एक असलेल्या नांझा गावातही अजूनपर्यंत डिजीटल शाळा झालेली नाही. पंचायत समितीच्या मुख्य पदाधिकाऱ्यांच्या गावातील हि स्थिती असेल तर इतर गावानी काय आदर्श घ्यावा, यावर विचारमंथन न केलेलेच बरे. पंचायत समिती सदस्य तथा माजी सभापती प्रल्हाद मांडवकर यांच्या देवनळा या गावातही डिजीटल शाळेसाठी प्रयत्न झालेले नाही. ही स्थिती माजी उपसभापती विजय सुटे यांच्या सुकळी गावची आहे. पंचायत समिती सदस्य किरण पवार यांच्या किन्हाळा गावही डिजीटल शाळेपासून वंचित आहे. तसेच पंचायत समिती सदस्य तिलोत्तमा मडावी यांचे पिंपळगाव गावातही डिजीटल शाळेला खो मिळालेला आहे. केवळ जिल्हा परिषद सदस्य दिवाकर ढोले यांच्या परसोडी या गावात डिजीटल शाळा सुरु करण्यात आली. परसोडी येथील सरपंच आनंदराव जगताप यांची डिजीटल शाळा करण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका राहिलेली आहे, हे विशेष.