शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
3
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
4
"बटेंगे तो कटेंगे भाषा महाराष्ट्रात नाही चालणार"; सुप्रिया सुळेंचे भाजपवर टीकास्त्र
5
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
7
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
8
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
9
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
10
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
12
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
13
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
14
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
15
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
16
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
17
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
18
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
19
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर
20
महाराष्ट्रात मविआ सरकार स्थापन करु, एकही प्रकल्प बाहेर जाऊ देणार नाही; राहुल गांधींचा शब्द

लॉर्ड बुद्धा व जमात-ए-इस्लामी हिंदच्या संयोजनात व्याख्यान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2017 11:32 PM

येथील आझाद मैदानात आयोजित स्मृती पर्वात शुक्रवारी लॉर्ड बुद्धा आणि जमात-ए-इस्लामी हिंदच्या संयोजनात व्याख्यान झाले. लॉर्ड बुद्धाच्या संयोजनातील व्याख्यानाचा विषय ‘संवैधानिक भारत राष्ट्रनिर्माण काळाची गरज’ हा होता. भैयासाहेब खैरकार व्याख्याते होते.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील आझाद मैदानात आयोजित स्मृती पर्वात शुक्रवारी लॉर्ड बुद्धा आणि जमात-ए-इस्लामी हिंदच्या संयोजनात व्याख्यान झाले.लॉर्ड बुद्धाच्या संयोजनातील व्याख्यानाचा विषय ‘संवैधानिक भारत राष्ट्रनिर्माण काळाची गरज’ हा होता. भैयासाहेब खैरकार व्याख्याते होते. जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरी आडे अध्यक्षस्थानी होत्या.भैयासाहेब खैरकार म्हणाले, संवैधानिक पद धारण केलेला प्रत्येक अधिकारी तसेच पदाधिकाऱ्याची कृती संविधानाला साजेशीच असली पाहिजे. धर्मनिरपेक्षता, समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय या मूल्याचे तंतोतंत पालन त्यांनी केले तरच संवैधानिक भारत खऱ्या अर्थाने निर्माण होईल. जात, धर्म, भाषा व प्रांत यावरून कुठलाही भेदभाव त्यांच्याकडून होऊ नये, अशी रास्त अपेक्षा सामान्य नागरिकांची आहे. ही प्रक्रिया ज्या दिवशी सुरू होईल तेव्हाच समता प्रस्थापित होईल आणि भारतात लोकशाही नांदायला लागेल, असे ते म्हणाले.अध्यक्षीय मार्गदर्शनात माधुरी आडे म्हणाल्या, संविधानाने स्त्रियांना दिलेले अधिकार व्यापक आहेत. मी आज केवळ बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या संविधानामुळेच एवढ्या मोठ्या पदावर विराजमान होऊ शकले.यावेळी बाळासाहेब गावंडे यांनीही विचार मांडले. प्रसंगी मंचावर के.एस. नाईक, बलवंत गजभिये, व्ही.एस. आठवले, प्रकाश भस्मे, पुरुषोत्तम भजगवरे, चंद्रबोधी घायवटे, संजय मानकर आदी उपस्थित होते.जमात-ए-इस्लामी हिंदजमात-ए-इस्लामी हिंदच्या संयोजनात ‘पैगंबर मोहम्मद यांचे मानवतेवरील उपकार’ या विषयावर व्याख्यान झाले. अब्दुल मुजीब मोमीन साहेब उदगीर हे व्याख्याते होते. ते म्हणाले, इस्लामचे तत्त्व हे केवळ मुस्लीम धर्मीयांसाठीच नाही. प्रत्येकांनीच इस्मालचे विचार अंगिकारण्याची गरज आहे. पवित्र कुरानमध्ये अतिशय चांगल्या गोष्टी नमूद करून ठेवल्या आहेत. मानवी कल्याणासाठी याचा उपयोग होऊ शकतो, असे ते म्हणाले.प्रास्ताविक प्रा. वसीम खान, संचालन प्रा. सैयद मोहसीन, आभार मो. शोएब सहीर यांनी मानले. मंचावर मन्सूर एजाज जोश, जियाउद्दिन भाई, रियाज हुसेन सिद्दिकी, डॉ. अबरार अहमद खान, शेख महेबूब आलम, फरखान अहमद खान, वजिदउल्ला खान, नईन खान, काझी रिजवान, अ‍ॅड. इमरान देशमुख, जुनेद खान, मो. अकबर शाहीद अलदाज, मिर्झा अवतार बेग, आजिमुर्रहमान, राहिल बेग आदी उपस्थित होते. प्रारंभी सदप पैकर या विद्यार्थिनीने पैगंबर मोहम्मद साहेबांवरील सुरेश भट यांची मराठीतील कविता सादर केली.व्याख्यानप्रसंगी स्मृती पर्वाचे समन्वयक ज्ञानेश्वर गोरे, कवडुजी नगराळे, आनंद गायकवाड, संजय बोरकर, सुनील वासनिक, सुनीता काळे, माया गोबरे, विशाखा गजभिये, दीपक नगराळे, धनंजय गायकवाड आदी उपस्थित होते.