लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : विधान परिषदेची यवतमाळातील पोटनिवडणूक शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी या महाविकास आघाडीतील एकजुटीने एकहाती जिंकली. महाविकास आघाडीचे उमेदवार दुष्यंत सतीश चतुर्वेदी भाजपला जबर धक्का देत ११३ मतांनी निवडून आले. त्यांनी भाजपचे उमेदवार सुमित बाजोरिया यांचा पराभव केला.प्रा. तानाजी सावंत विधानसभेवर निवडून गेल्याने विधान परिषदेच्या यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची ही जागा रिक्त झाली होती. त्यासाठी पोटनिवडणूक घेण्यात आली. ३१ जानेवारी रोजी सात केंद्रांवर मतदान पार पडले. सर्व ४८९ मतदारांनी आपला हक्क बजावला. या पोटनिवडणुकीची मतमोजणी मंगळवारी सकाळी ८ वाजतापासून जिल्हाधिकारी कार्यालयात बचत भवनात जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अजय गुल्हाने यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. पहिल्याच पसंतीत महाविकास आघाडीचे दुष्यंत चतुर्वेदी यांनी बाजी मारली. अवघ्या दीड तासात निकाल घोषित करण्यात आला. चतुर्वेदी यांना २९८ मते मिळाली. तर सुमित बाजोरिया यांना १८५ मतांवर समाधान मानावे लागले. सहा मते अवैध ठरली. वनमंत्री संजय राठोड आणि भाजपचे आमदार, माजी राज्यमंत्री मदन येरावार यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याही या निवडणुकीकडे नजरा लागल्या होत्या. अखेर शिवसेनेचा उमेदवार असलेल्या दुष्यंत चतुर्वेदी यांनी महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या मदतीने विजयाचा हा गड सर केला.विजयाची घोषणा होताच महाविकास आघाडीच्या सर्व प्रमुख नेत्यांनी मतमोजणी केंद्रावर धाव घेतली. तेथे शिवसैनिकांनी फटाके फोडून, मिठाई वाटून व ढोलताशे वाजवून विजयाचा जल्लोष केला. सुरक्षेच्या दृष्टीने मतमोजणी केंद्राकडे जाणारे मार्ग पोलिसांनी बंद केले होते. दुष्यंत चतुर्वेदी यांच्या विजयाचे साक्षीदार होण्यासाठी त्यांचे वडील माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, आई आभा चतुर्वेदी, पत्नी शीतल चतुर्वेदी आणि नागपुरातील समर्थक येथे दाखल झाले होते. चतुर्वेदी यांच्या विजयाची घोषणा होताच महाविकास आघाडीचे नेते वनमंत्री संजय राठोड यांनी त्यांना पेढा भरवून शुभेच्छा दिल्या.भाजपने साडेतीनशे मतदारांशी ‘संपर्क’ करून त्यांचे आपल्याला पाठबळ असल्याचा दावा केला होता. परंतु भाजपला मिळालेली १८५ मते पाहता या मतदारांनी भाजपला दिलेला शब्द पाळला नसल्याचे दिसून येते. काँग्रेस, राष्टÑवादीच्या मतदारांना फोडून महाविकास आघाडीत खिंडार पाडण्याचा भाजपचा मनसुबा होता. मात्र दुष्यंत चतुर्वेदी यांनी २९८ मतांसह मिळविलेल्या विजयामुळे हा मनसुबा उधळला गेल्याचे स्पष्ट होते. महाविकास आघाडीकडे ३२७ मतदारांचे पाठबळ होते. त्यापैकी २९ मतदारांनी दगाफटका करीत महाविकास आघाडीकडे पाठ फिरविली. त्यामुळे दुष्यंत यांना २९८ मते मिळाली. दोन्ही बाजूची मते फुटल्याची जिल्ह्याच्या राजकीय गोटात चर्चा असून त्याबाबत तर्क लावले जात आहे. ना. संजय राठोड यांनी मात्र महाविकास आघाडी एकसंघ असून त्यामुळेच हा विजय झाल्याचे म्हटले आहे. भाजपने पैशाच्या जोरावर ही निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न केला. मात्र जागरुक मतदारांनी त्यांना साथ दिली नाही, अशी प्रतिक्रिया ना. संजय राठोड यांनी नोंदविली. दुष्यंत चतुर्वेदी यांनी मुख्यमंत्र्यांचा विश्वास व मतदारांनी दिलेल्या आशीर्वादाला कधीही तडा जाऊ देणार नाही, असे सांंगितले. दुष्यंत यांच्या विजयामुळे महाविकास आघाडीचे संख्याबळ विधान परिषदेत एकने वाढले आहे.सहा मते अवैधविधान परिषदेच्या या पोटनिवडणुकीत एकूण ४८९ मतदार होते. त्यातील २९८ मते दुष्यंत चतुर्वेदी तर १८५ मते सुमित बाजोरिया यांना मिळाली. सहा मते अवैध ठरली. त्यापैकी चार मतपत्रिका कोऱ्या निघाल्या. त्याच्या मागच्या बाजूने अंक लिहिले गेले. एका मतपत्रिकेवर उभ्या ऐवजी आडवी रेष मारली गेली. तर एका मतपत्रिकेवर पहिला पसंतीक्रम न लिहिता थेट दुसºयापासून सुरूवात केली गेली. त्यामुळे या सहा मतपत्रिका अवैध ठरविल्या गेल्या.
महाविकास आघाडीने विधान परिषद जिंकली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2020 6:00 AM
प्रा. तानाजी सावंत विधानसभेवर निवडून गेल्याने विधान परिषदेच्या यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची ही जागा रिक्त झाली होती. त्यासाठी पोटनिवडणूक घेण्यात आली. ३१ जानेवारी रोजी सात केंद्रांवर मतदान पार पडले. सर्व ४८९ मतदारांनी आपला हक्क बजावला. या पोटनिवडणुकीची मतमोजणी मंगळवारी सकाळी ८ वाजतापासून जिल्हाधिकारी कार्यालयात बचत भवनात जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अजय गुल्हाने यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.
ठळक मुद्देपोटनिवडणुकीत एकजूट : दुष्यंत चतुर्वेदी ११३ मतांनी विजयी, भाजपचा पराभव, शिवसैनिकांनी केला जल्लोष