लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : तालुक्यातील नागापूर येथे श्ेतातील बांधावार जाऊन येथील कृषी महाविद्यालयाच्या कृषी कन्यांनी श्ेतक्ºयांना माती परीक्षणाचे धडे दिले.विद्यार्थिनींनी शेतात जाऊन माती परीक्षणाचे प्रात्यक्षिक सादर केले. जमिनीची सुपिकता जपण्यासाठी, सातत्याने माती परीक्षण केले पाहिजे, असे सांगितले. पिकांच्या वाढीसाठी आवश्यक घटकांची पूर्तता जमिनीतून होत असते. त्यासाठी योग्य खत नियोजन करताना माती परीक्षण अहवालाचा लाभ होतो. माती परीक्षणातून उपलब्ध नत्र, स्फुरद, पालाश, सूक्ष्मअन्नद्रव्ये, सेंद्रिय कर्ब, जमिनीचा सामू, विद्राव्य क्षारांचे प्रमाण आदींची माहिती मिळते. याबाबत शेतकºयांना सविस्तर माहिती देण्यात आली.पीक काढल्यानंतर किंवा पेरणीपूर्वी तसेच खत देण्यापूर्वी किंवा खत दिल्यानंतर तीन महिन्यांनी मातीचा नमुना घ्यावा. जमिनीची एकरूपता, रंग, सुपिकता, खडकाळपणा, उंच-सखलपणा लक्षात घेऊन वेगवेगळे भाग पाडावे. मोठा भाग पाच एकरपेक्षा मोठा नसावा. सात ते १८ नमुने गोळा करावे. नमुना घेण्यासाठी २० सेंटीमीटर खड्डा करावा. माती बाहेर काढून खड्ड्याच्या कडेची माती प्लॉस्टिकच्या घमेल्यात घ्यावी.सर्व खड्ड्यातून जमा केलेल्या मातीतून खडे, पालापाचोळा, कचरा बाजूला काढावा. नमुना सावलीत वाळवून कापडी पिशवीत भरुन माती परीक्षण प्रयोगशाळेत पाठवावा. नमुन्यासोबत शेतकºयांनी त्यांची सर्व माहिती त्यासोबत देणे आवश्यक ठरते, असे सांगण्यात आले. प्राचार्य डॉ.व्ही.ओ. बोंढारे, प्रा.एस.के. चिंतले, प्रा.वाय.एस. वाकोडे, यांच्या मार्गदर्शनात काजल वानखेडे, निखिता जामोदकर, कोमल कदम, वसुंधरा चौधरी, सोनू चौधरी, अंकिता नरवाडे, विनल पोहाने, कामिनी बनसोड यांनी माती परीक्षण केले. यावेळी विवेक वासकर, पुराशिंग, गुणवंत कदम व परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
नागापूरच्या शेतकऱ्यांनी घेतले माती परीक्षणाचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2019 10:30 PM
तालुक्यातील नागापूर येथे श्ेतातील बांधावार जाऊन येथील कृषी महाविद्यालयाच्या कृषी कन्यांनी श्ेतक्ºयांना माती परीक्षणाचे धडे दिले. विद्यार्थिनींनी शेतात जाऊन माती परीक्षणाचे प्रात्यक्षिक सादर केले.
ठळक मुद्देशेतकऱ्यांना मार्गदर्शन : बियाणे निवड, लागवडीची दिली माहिती