शहरं
Join us  
Trending Stories
1
हर्षवर्धन पाटलांचा भाजपाला रामराम; शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची घोषणा
2
इंदापूरात भाजपाचे बॅनर्स हटवले; हर्षवर्धन पाटील 'तुतारी' चिन्हावर विधानसभा लढणार?
3
संयुक्त राष्ट्रात भारतानं काढली पाकिस्तानची खरडपट्टी; जगाला दाखवला 'दहशतवादी' चेहरा
4
Mumbai: बापच 5 वर्षांपासून करत होता बलात्कार; अल्पवयीने मुलीने व्हिडीओ बनवून...
5
भाजपा नेत्याने राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचे जाहीरच केले; व्हिडीओ पाहून शरद पवारही चकीत
6
Supriya Sule : "दुर्दैवाने महाराष्ट्र महिलांसाठी सुरक्षित राहिलेला नाही"; सुप्रिया सुळेंनी व्यक्त केला संताप
7
राहु नक्षत्रात शनी गोचर: ६ राशींची प्रगती, बचतीत यश; व्यवसायात नफा, नवीन नोकरीची संधी!
8
Navratri 2024: देवीच्या आरतीतलं प्रत्येक कडवं जणू काही देवीशी प्रत्यक्ष संवादच; वाचा भावार्थ!
9
पुणे हादरलं! मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर लैंगिक अत्याचार, तिघांना पोलिसांनी घेतले ताब्यात
10
Navratri 2024: नवरात्रीत केवळ डिजेवर नाचून नाही तर 'अशी' करा शक्तीची उपासना!
11
"ट्रेनचा स्पीड कमी करुन..."; वंदे भारतवर दगडफेक करणाऱ्याने सांगितलं धक्कादायक कारण
12
Women's T20 World Cup, INDW vs NZW : कसा आहे दोन्ही संघातील रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
13
भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याने काय बदल होतात? नागपूरकरांनी लढलेला दीर्घ लढा अखेर यशस्वी
14
"त्या सिनेमाचा हिरो रात्री १२ वाजता मला...", मल्लिका शेरावतचा खुलासा, नेटकऱ्यांनी लावला अंदाज
15
"मला संपवू नका, मीच राहिलो नाही, तर तुम्ही...", अशोक चव्हाणांचे विधान चर्चेत
16
...तर शरद पवारांसोबत चर्चा करू; MIM च्या मविआतील प्रवेशावर ठाकरे गटाची भूमिका
17
खळबळजनक! "तुमची मुलगी एका..."; डिजिटल अरेस्ट, ८ कॉल, 'त्या' फोनने आईला हार्ट अटॅक
18
अभिजात दर्जासाठी पहिली समिती ते आतापर्यंतचा प्रवास... अखेर तेव्हापासूनच्या प्रयत्नांना यश
19
आता GPay युझर्सना मिळणार Gold Loan; 'या' कंपनीसह झाला करार, पाहा डिटेल्स
20
शेअर बाजार उघडताच पुन्हा विक्री सुरू, सेल ऑन राइजमध्ये अडकला बाजार; BPCL, एशियन पेंट्स आपटला

साहित्यिकांनी अगत्याने येऊन आपले म्हणणे मांडावे, यवतमाळ जिल्हावासीयांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2019 5:48 PM

यवतमाळ जिल्ह्याला ४५ वर्षानंतर साहित्य संमेलनाच्या आयोजनाचा बहुमान मिळाला. संमेलनाच्या उद्घाटकाचे निमंत्रण रद्द करणे ही अतिशय दुर्दैवी घटना येथे घडली.

यवतमाळ - जिल्ह्याला ४५ वर्षानंतर साहित्य संमेलनाच्या आयोजनाचा बहुमान मिळाला. संमेलनाच्या उद्घाटकाचे निमंत्रण रद्द करणे ही अतिशय दुर्दैवी घटना येथे घडली. मात्र यवतमाळकरांच्या अस्मितेला ठेच पोहोचल्यानंतरही हे संमेलन यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी सर्वजण एकत्र आलो आहोत. साहित्यिकांनीही त्यांच्या भावना, विचार संमेलनात सहभागी होऊन व्यक्त कराव्या, अशी भूमिका यवतमाळकर जनतेच्यावतीने आयोजित पत्रपरिषदेत मांडण्यात आली. अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या आयोजनासाठी समितीचे कार्याध्यक्ष डॉ. रमाकांत कोलते व त्यांच्या सहकार्यांनी अनेक वर्षांपासून प्रयत्न केले. महत प्रयासानंतर यवतमाळकरांना साहित्य संमेलनाचे यजमान पद भूषविण्याची संधी मिळाली. जिल्ह्याला समृद्ध अशी साहित्यिकांची परंपरा लाभली आहे. त्यातच संमेलन यवतमाळात होणार याचा अत्यानंद सर्वांनाच झाला. संमेलनाच्या आयोजनासाठी समितीनेही कठोर परिश्रम घेतले. त्यानंतर मुख्य उद्घाटक नयनतारा सहगल यांना दिलेले निमंत्रण ऐनवेळी रद्द झाले. या दुर्दैवी घटनेनंतर अनेक घडामोडी सातत्याने होत आहेत. अशा स्थितीत अनेक साहित्यिकांनी संमेलनावर बहिष्कार टाकण्याचीच घोषणा केली आहे. मात्र यवतमाळकर नागरिक या नात्याने साहित्य संमेलनाशी प्रत्येकाची अस्मिता जुळल्या गेली आहे. जे झाले ते वाईट झाले आता संमेलन मात्र यशस्वीरीत्या पार पडायला हवे. साहित्यिकांनीही त्यांच्या भावना येथे येऊन व्यक्त कराव्या, असे आवाहन यवतमाळकरांच्यावतीने करण्यात आले. मराठी साहित्याने कूस बदलली ंआहे.पहिल्यांदाच संमेलनाच्या अध्यक्ष व उद्घाटक या दोन्हीही महिलाच होत्या. आता महिला अध्यक्ष असणेही भूषणवाहबाब आहे.  यवतमाळात येणारा मराठी साहित्यिक  हा पाहुणा नसून आमचं गणगोत आहे या भावनेतून त्यांचे स्वागत केले जाईल, अशी भूमिका पत्रपरिषदेतून मांडली. यावेळी माजी आमदार दिवाकर पांडे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रवीण देशमुख, डॉ. विजय कालवकर, डॉ.टी.सी. राठोड, अ‍ॅड. जयसिंह चव्हाण, साहित्यिक आनंद गायकवाड, अशोक बोबडे, नानाभाऊ गाडबैले, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष  मनीष पाटील, सुरेश राठी, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. मिनाज मलनस, शिवसेना जिल्हा प्रमुख राजेंद्र गायकवाड, प्रा. डॉ. नितीन खर्चे, जिल्हा बँकेचे संचालक बाबूपाटील वानखडे, विद्या खडसे, नगरसेवक वैशाली सवाई, दिनेश गोगरकर, सुरेश चिंचोळकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलनYavatmalयवतमाळ