विलास गावंडे ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : आंतरजिल्हा वाहतुकीची मुभा मिळाल्याने गुरुवारी जिल्ह्यातील सर्व नऊही आगारातून जिल्ह्याबाहेर बसेस सोडल्या जाणार आहे. अमरावती, नागपूर, चंद्रपूर, अकोला यासह लागून असलेल्या सर्व जिल्ह्यात यवतमाळ विभागातून लालपरी जाणार आहे. एसटीच्या प्रवासासाठी ई-पास लागणार नसल्याने गेली पाच महिन्यांपासून बाहेरजिल्ह्यात अडकून पडलेल्या सामान्य लोकांना आपल्या गावी येता येणार आहे.कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी आणि लॉकडाऊन सुरू झाल्याने २२ मार्चपासून एसटीची चाके रुतली होती. कालांतराने लॉकडाऊनमध्ये काही सूट देण्यात आली. तेव्हा जिल्हाअंतर्गत प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आली. आता जिल्ह्याबाहेर प्रवासी वाहतुकीला गुरुवार २२ ऑगस्टपासून मुभा देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या यवतमाळ विभागातून गुरुवारपासून १२९ शेड्यूल सोडले जाणार आहे. अर्थात एसटी बसेसच्या जवळपास ६५ फेऱ्या होणार आहे. सर्वच आगारातून बाहेर जिल्ह्यासाठी बसेस सोडल्या जाणार आहे. यवतमाळ जिल्ह्याला लागून असेल्या अमरावती, नागपूर, चंद्रपूर, अकोला, नांदेड याठिकाणी प्रायोगिक तत्वावर बसेस सोडल्या जातील. सकाळी ७ वाजतापासून फेऱ्या सोडण्याचे महामंडळाचे नियोजन आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लालून देण्यात आलेल्या सर्व नियमांचे पालन करून प्रवासी वाहतूक केली जाणार आहे. बाहेरून आलेल्या सर्व बसेस सॅनिटराईज करण्यात येणार असून, आवश्यक ती खबरदारी घेतली जाणार आहे. प्रवासी संख्या वाढल्यानंतर टप्प्याटप्प्याने बसफेऱ्यां वाढविण्यात येणार आहे. बसने प्रवास करण्यासाठी ई-पासची गरज भासणार नाही. नागरिकांना बाहेर जिल्ह्याचा प्रवास सोयीचा होईल. लॉकडाऊनपूर्वी यवतमाळ विभागातून दररोज सुमारे ४६० शेड्यूल सोडले जात होते. जसजशी प्रवाशी संख्या वाढत जाईल, तसतशी बसफेऱ्यांची संख्याही वाढविली जाणार आहे. थेट अन् फक्त २२ प्रवासी घेणारसोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी केवळ २२ प्रवासी घेऊनच वाहतूक केली जाणार आहे. तेही थेट प्रवासी असणार आहे. ही संख्या पूर्ण झाल्याशिवाय बस फलाटावरून सोडली जाणार नाही. ही अट केवळ बाहेर जिल्ह्यात जाणाºया बसेसकरिताच आहे. सध्या सुरू असलेल्या बसेस आहे त्यानुसारच धावणार आहे. महालक्ष्मी, गणपती हे सण उत्सव कॅश करण्यासाठी लांब पल्ल्याच्या बसेस सोडण्याचाही प्रयत्न यवतमाळ विभागाचा राहणार आहे.गुरुवारपासून १२९ शेड्यूल सोडण्याची तयारी आहे. यवतमाळला लागून असलेल्या सर्वच जिल्ह्यात फेºया सोडल्या जातील. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर घालून दिलेले सर्व नियम पाळले जाईल. प्रवाशांची सुरक्षितता महत्वाची आहे. प्रवाशी संख्या वाढल्यानंतर फेºयाही वाढविल्या जाईल.- श्रीनिवास जोशी,विभाग नियंत्रक, यवतमाळ
चलो अमरावती, नागपूर, चंद्रपूर, अकोला, नांदेड, वाशिम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2020 5:00 AM
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी आणि लॉकडाऊन सुरू झाल्याने २२ मार्चपासून एसटीची चाके रुतली होती. कालांतराने लॉकडाऊनमध्ये काही सूट देण्यात आली. तेव्हा जिल्हाअंतर्गत प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आली. आता जिल्ह्याबाहेर प्रवासी वाहतुकीला गुरुवार २२ ऑगस्टपासून मुभा देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या यवतमाळ विभागातून गुरुवारपासून १२९ शेड्यूल सोडले जाणार आहे.
ठळक मुद्दे‘लालपरी’ आजपासून जिल्ह्याबाहेर : पाच महिन्यांपासून अडकून पडलेले नागरिक आता घरी पोहोचणार