शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
6
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
7
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
8
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
9
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
10
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
11
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
12
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
13
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
14
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
15
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
16
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
17
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
20
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान

आधी लोकसभेची उधारी द्या नंतर विधानसभेचे बोला !

By admin | Published: July 12, 2014 1:46 AM

आधी लोकसभ निवडणुकीतील प्रचाराची उधारी द्या नंतर आगामी विधानसभेचे बोला, अशा शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी ...

यवतमाळ : आधी लोकसभ निवडणुकीतील प्रचाराची उधारी द्या नंतर आगामी विधानसभेचे बोला, अशा शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांपुढे आक्रमक भूमिका घेतली. मनसेच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक शुक्रवारी येथे शासकीय विश्रामभवनात पार पडली. यावेळी आमदार शिशिर शिंदे, सरचिटणीस शिरीष सावंत, जयप्रकाश बावीस्कर, संपर्क प्रमुख श्रीधर जगताप प्रामुख्याने उपस्थित होते. सुमारे दीड तास ही बैठक चालली. त्यातील पाऊण तास हा लोकसभेतील उधारीवरच्या चर्चेत गेला. लोकसभा निवडणुकीत वाशिमचे राजू पाटील राजे मनसेचे उमेदवार होते. त्यांच्याकडे निवडणूक काळातील उधारी आहे. बॅनर्स, आॅटोरिक्षा, लाऊड स्पिकर, वृत्तपत्र्यांच्या जाहिराती आदींचे पैसे देणे बाकी आहे. आधी थकबाकीची ही रक्कम द्या, नंतर विधानसभेच्या विषयावर चर्चा करू, अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली. त्यामुळे काही काळ नेतेही गोंधळून गेले. अखेर थकीत पैशाची तत्काळ व्यवस्था केली जाईल, असे आश्वासन नेत्यांनी दिले. त्यानंतर जिल्ह्यात मनसेची स्थिती, पक्ष संघटन, आगामी विधानसभेच्या दृष्टीने किती मतदारसंघात पक्षाची ताकद आहे, कोण उमेदवार राहू शकतो, मनसेमध्ये येण्यासाठी इच्छुक असलेल्या नेत्यांची नावे अशा विविध मुद्यांवर यावेळी चर्चा झाली. विशेषत: यवतमाळ, वणी आणि राळेगाव या तीन विधानसभा मतदारसंघावर मनसेने लक्ष केंद्रीत केल्याचे दिसून आले. यवतमाळ मतदारसंघात एका दाम्पत्यासह तब्बल सहा जणांनी दावा सांगितला आहे. तर भाजपामधून मनसेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या एका डॉक्टरचे नाव मनसे कार्यकर्त्यांनी नेत्यांपुढे उघड केले. वणी विधानसभा मतदारसंघात आतापर्यंत एकजूट दिसत होती. केवळ एकच नाव दावेदार म्हणून पुढे येत होते, परंतु आजच्या बैठकीत या भ्रमाचाही फुगा फुटला. मनसेच्या सहा नगरसेवकांनी आपली वेगळी चूल मांडत एका महिला पदाधिकाऱ्याचे नाव विधानसभेचे उमेदवार म्हणून पुढे केले. त्यामुळे प्रबळ दावेदाराला चांगलाच धक्का बसला. यावेळी या दोनही गटात शाब्दिक चकमक झाल्याचेही सांगितले जाते. राळेगाव मतदारसंघातून राष्ट्रसंतांच्या विचारावर चालणाऱ्या कार्यकर्त्याचे आणि दारूतील महसूल वसुलीचा दीर्घ अनुभव असलेल्या एका अधिकाऱ्याचे नाव संभाव्य उमेदवार म्हणून या बैठकीत चर्चिले गेले. केळापूर-आर्णी मतदारसंघातून एका अभियंत्याच्या नावावर चर्चा झाली. अन्य विधानसभा मतदारसंघातूनही अशीच काही नावे पुढे आली. (कार्यालय प्रतिनिधी)