वणी (यवतमाळ) : झरी तालुक्यातील खरबडा येथे वीज कोसळून पाच जनावरे जागीच ठार झाली. ही घटना शनिवारी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली. सदर जनावरे संतोष नागरतवार व हनमंत्तू कोत्तावार या शेतकºयांच्या मालकीची होती. सदर घटनेचा रविवारी तलाठ्याने पंचनामा केला.
केळापूर तालुक्यात शनिवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास अचानक आलेले वादळाने चांगलेच तांडव घातले. यामुळे तालुक्यातील खैरगाव(खु) व धारणा या दोन गावांत मोठे नुकसान झाले. खैरगावातील सुमारे ४० घरांना वादळाचा चांगलाच तडाखा बसला. अनेक घरांवरील छपरे उडून गेलीत. झाडे आणि विजेचे पोल उन्मळून पडले. त्यामुळे गावातील व परिसरातील वीज पुरवठा खंडीत झाला. वादळामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. .धारणा गावातील पाच ते सहा घरावरील छपरे उडून गेली. रविवारी दुपारनंतर महसूल विभागाची चमू खैरगावात सर्वेक्षणासाठी पोहचली होती.