लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्य शासनाच्या कर्जमाफी योजनेत न बसलेल्या शेतकऱ्यांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कर्ज वसुलीच्या नोटीस बजावल्या आहेत. त्यात शेतजमिनीचा हर्रास करण्याचा उल्लेख करण्यात आला आहे. यामुळे कुठलेही पीक हातात नसताना कर्जवसुलीच्या आलेल्या नोटीसने शेतकरी हादरले आहेत.राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून कर्जमाफीची घोषणा केली. शेवटच्या शेतकºयाचे कर्ज माफ होईपर्यंत या योजनेची अंमलबजावणी करण्याचा दावा करण्यात आला होता.थकबाकीदार शेतकऱ्यांना दीड लाखापर्यंत कर्जमाफी देण्यात आली होती. तर त्यावरील कर्जासाठी ‘वनटाईम सेटलमेंट’ योजने अंतर्गत. अतिरिक्त पैसे भरल्यानंतर माफी दिली जाणार होती. त्याकरिता ग्रीन लिस्टमध्ये नाव येणे गरजेचे होते. प्रत्यक्षात जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचे नाव ग्रीन लिस्टमध्ये आलेच नाही. यामुळे असे शेतकरी अजूनही कर्जमाफीच्या प्रक्रियेबाहेर आहेत. आता काही शेतकऱ्यांना जिल्हा मध्यवर्ती बँकेने कर्ज वसूलीच्या नोटीस बजावल्या आहेत. यामुळे शेतकरी हादारले आहेत.चापडोहचे शेतकरी रामकृष्ण हनुमंत वाळवे यांनी २००८ मध्ये ट्रॅक्टरकरीता कर्ज घेतले होते. त्यामध्ये शेती गहान ठेवण्यात आली होती. साडेपाच लाख रूपयांचे हे कर्ज होते. हे कर्ज थकल्याने ट्रॅक्टरचा हर्रास करण्यात आला. यानंतर ९ लाख रूपयांचे कर्ज आहे. असे बँकेने पत्र पाठविले आहे. शेतजमिनीचा हर्रासाचे संकेत दिले आहे. मुळात कुठलेही पीक हातात नाही. जंगली जनावरांचा त्रास वाढला आहे. यातून मार्ग कसा काढावा हा पेच शेतकºयांपुढे आहे. हा शेतकरी स्वता रोजमजूरी करतआहे.खानगावचे शेतकरी श्रीनीवास मुराब आणि प्रेम मुराब यांनी २००८ मध्ये साडेपाच लाखाचे कर्ज घेतले होते. ते आता १८ लाख झाले आहे. ज्या ट्रॅक्टरकरीता कर्ज घेण्यात आले. त्या ट्रॅक्टरचाच अपघात झाला. अशा स्थितीत हातात पीक नाही. कर्जमाफीत नाव नाही. हातात पीक नाही. हे कर्ज फेडायचे कसे असा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे.कर्जमाफीला मुकलेल्या शेतकऱ्यांचा आकडा गुलदस्त्यातसत्ताधारी निवडणूक प्रचारात कर्जमाफीचा गवगवा करीत आहे. तर दुसरीकडे कर्जमाफी न मिळालेल्या शेतकºयांकडून वसुलीसाठी बँकेने नोटीसा बजावणे सुरू केले आहे. असे किती शेतकरी आहेत, याचा आकडा बँक देण्यास तयार नाही.बॅँक म्हणते, नियमात बसत नसल्याने नोटीसया संदर्भात जिल्हा मध्यवर्ती बँकेशी संपर्क साधला असता बँक प्रशासनाकडून नियमात कर्ज बसत नसल्याने ही नोटीस बजावण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले. किती शेतकऱ्यांना या नोटीस बजावल्या गेल्या याची माहिती बँकेकडे उपलब्ध नाही. तालुका स्तरावरून ही कारवाई झाल्याचे सांगितले जात आहे.कर्जाच्या थकबाकीने बँकेचा एनपीए मोठा आहे. अशा ज्या शेतकऱ्यांचे कर्ज नियमात बसले नाही. अशाच शेतकऱ्यांना ही नोटीस बजावली आहे. बँकेची ही रूटीन कारवाई आहे.- प्रशांत दरोईविशेष कार्यासन अधिकारीजिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक
शेतकऱ्यांना कर्जवसुली नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2019 6:00 AM
थकबाकीदार शेतकऱ्यांना दीड लाखापर्यंत कर्जमाफी देण्यात आली होती. तर त्यावरील कर्जासाठी ‘वनटाईम सेटलमेंट’ योजने अंतर्गत. अतिरिक्त पैसे भरल्यानंतर माफी दिली जाणार होती. त्याकरिता ग्रीन लिस्टमध्ये नाव येणे गरजेचे होते. प्रत्यक्षात जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचे नाव ग्रीन लिस्टमध्ये आलेच नाही. यामुळे असे शेतकरी अजूनही कर्जमाफीच्या प्रक्रियेबाहेर आहेत.
ठळक मुद्देकर्जमाफी फसली : पीकच आले नाही तर लाखोंची फेड करायची कशी?