लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : मुख्यमंत्र्यांच्या दत्तकगावात स्वत:चे सरण रचून आत्महत्या करणाºया माधव रावतेंचे मरण राज्यभरात चर्चेत असतानाच तालुक्यात आणखी एका कर्जबाजारी शेतकºयाने स्वत:ला जाळून घेतले. पहाटे ३ वाजता समाज साखरझोपेत असताना घरासमोर येऊन त्यांनी स्वत:ला पेटवून घेतले. लोक वाचविण्यासाठी येईपर्यंत ते ९० टक्के भाजले. आता नांदेडच्या शासकीय रुग्णालयात त्यांची मृत्यूशी झुंज सुरू आहे.श्यामराव रामा भोपळे (६०) रा. मार्लेगाव असे या वृद्ध शेतकऱ्याचे नाव आहे. ते अल्पभूधारक शेतकरी असून नापिकीचा त्यांना सामना करावा लागत आहे. त्यातच सहकारी सोसायटीच्या कर्जामुळे ते चिंतेत होते. रविवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास ते घराबाहेर आले. सारे जग गाढ झोपेत असताना त्यांनी स्वत:च्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून घेतले. ही बाब लक्षात येताच घरातील मंडळी आणि शेजाºयांनी त्यांना वाचविण्यासाठी धाव घेतली. मात्र तोपर्यंत श्यामराव भोपळे पूर्णत: भाजले होते.त्यांना गंभीर अवस्थेत उमरखेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी उपचार केले. मात्र ९० टक्के जळले असल्याने त्यांना नांदेड येथील शासकीय रुग्णालयात ‘रेफर’ करण्यात आले. नांदेड येथे उपचार सुरू असून भोपळे यांची प्रकृती चिंताजनक आहे.१४ एप्रिल रोजी मुख्यमंत्र्यांचे दत्तकगाव असलेल्या सावळेश्वरमध्ये माधवराव रावते या शेतकऱ्याने स्वत:चे सरण रचून जाळून घेऊन आत्महत्या केली. त्यामुळे उमरखेडचे प्रशासन हादरून गेले होते. त्या घटनेची चर्चा अद्याप शमलेली नसतानाच तालुक्यात आणखी एका शेतकऱ्याने जाळून घेत आत्महत्येचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे.मुले म्हणतात, कर्जामुळेच हा प्रयत्नश्यामराव भोपळे यांनी कर्जामुळेच आत्महत्येचा प्रयत्न केला, असे त्यांच्या मुलांनी सांगितले. अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाच्या योजना देण्यात टाळाटाळ होत आहे. कर्जही थकित आहे. त्यातूनच आमच्या वडीलांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, असे श्यामराव यांची मुले रामदास भोपळे व पांडुरंग भोपळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
कर्जबाजारी शेतकऱ्याने घरापुढे जाळून घेतले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2018 11:52 PM
मुख्यमंत्र्यांच्या दत्तकगावात स्वत:चे सरण रचून आत्महत्या करणाºया माधव रावतेंचे मरण राज्यभरात चर्चेत असतानाच तालुक्यात आणखी एका कर्जबाजारी शेतकºयाने स्वत:ला जाळून घेतले. पहाटे ३ वाजता समाज साखरझोपेत असताना घरासमोर येऊन त्यांनी स्वत:ला पेटवून घेतले.
ठळक मुद्दे९० टक्के भाजल्याने गंभीर : सावळेश्वर पाठोपाठ मार्लेगावही हादरले