लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरातील चापडोह प्रकल्पातून पाणीपुरवठा होणाऱ्या बांगरनगर, विठ्ठलवाडी परिसरात बुधवारी सकाळी अकरा वाजता नळ आल्यानंतर काही मिनीटातच पुरवठा बंद झाला. यामुळे संतापलेल्या नागरिकांनी स्थानिक नगरसेवकांना सोबत घेऊन जीवन प्राधिकरण कार्यालयावर धडक दिली. तिथे कोणीच जाबाबदार अधिकारी नसल्याने कार्यालयाला कुलूप ठोकण्यात आले.चापडोह प्रकल्पातील पाणीसाठा पूर्णत: आटल्याने पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. या भागात नियमित नळ येत नाही. शहरातील इतर भागात नियमित पाणी दिले जाते. केवळ बांगरनगर परिसरावरच अन्याय होत असल्याचा आरोप करत काँग्रेस नगरसेवक वैशाली सवाई, विशाल पावडे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर विठ्ठलवाडी परिसरातील नागरिकांनी धडक दिली. एकाच दिवशी दोन मोर्चे जीवन प्राधिकरणावर धडकले. शहरातील पाणी समस्या भीषण रूप धारण करत आहे.यावेळी छाया कुटेमाटे, मालती सातव, भारती येन्नावार, कुसुम स्थूल, नीलिमा रामगीरवार, मंदा वांद्रेकर, काजल गाडगे, पुष्पा बिहाडे, सुनीता तिवाडे, पुनम चव्हाण, स्वाती पाटील, सारिका बिडवे, संगीता सोनार, किरण संजय लांडे, सुवर्णा राखे, प्रज्ञा बिडवे, ज्योती शेंडे यांच्यासह पाणीटंचाईने त्रस्त नागरिकांची उपस्थिती होती.
‘मजीप्रा’ला ठोकले कुलूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2018 1:13 AM
शहरातील चापडोह प्रकल्पातून पाणीपुरवठा होणाऱ्या बांगरनगर, विठ्ठलवाडी परिसरात बुधवारी सकाळी अकरा वाजता नळ आल्यानंतर काही मिनीटातच पुरवठा बंद झाला. यामुळे संतापलेल्या नागरिकांनी स्थानिक नगरसेवकांना सोबत घेऊन जीवन प्राधिकरण कार्यालयावर धडक दिली.
ठळक मुद्देकाही मिनिटांत गेले नळ : बांगरनगर, विठ्ठलवाडीवासीयांचा संताप