लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गुरुवारी होणाऱ्या मतदानासाठी बुधवारी सकाळीच उपविभागीय निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून पोलिंग पार्ट्या रवाना झाल्या. यवतमाळच्या पोलिंग पार्ट्या धामणगाव रोड स्थिती पॉलिटेक्निक कॉलेजमधून रवाना करण्यात आल्या. या लोकसभा मतदारसंघात दोन हजार १८१ ईव्हीएम, तेवढेच व्हीव्हीपॅड आणि चार हजार ३६२ बॅलेट युनिट रवाना करण्यात आले. ११ हजार कर्मचाऱ्यांची सेवा या मतदान प्रक्रियेत घेण्यात येत आहे. त्यांच्या दिमतीला ६६० वाहने आहेत. या सर्व वाहनांवर जीपीएसद्वारे प्रशासनाचा वॉच राहणार आहे.
Lok Sabha Election 2019; २१८१ ईव्हीएम मतदान केंद्रांवर रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 9:30 PM