लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : लोकसभेच्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघात किमान २५ टक्के व्हीव्हीपॅटची तपासणी व त्यातील चिठ्ठ्यांची मतमोजणी करावी, अशी आग्रही मागणी काँग्रेसने निवडणूक विभागाकडे केली आहे.यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात ११ एप्रिल रोजी मतदान पार पडले. त्याची मतमोजणी २३ मे रोजी केली जाणार आहे. त्यापूर्वीच काँग्रेसकडून सावधगिरीच्या दृष्टीने काही मुद्दे उपस्थित केले जात आहे. काँग्रेसचे उमेदवार माणिकराव ठाकरे यांच्यावतीने गुरुवार १८ एप्रिल रोजी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना मागणीचे निवेदन सादर करण्यात आले. त्यात या लोकसभा मतदारसंघातील राळेगाव, यवतमाळ, दिग्रस, पुसद, वाशिम, कारंजा या सहाही विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी २५ टक्के व्हीव्हीपॅट तपासणी केली जावी, शिवाय त्यातील चिठ्ठ्यांची मतमोजणी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. यापूर्वी काँग्रेसने ईव्हीएम ठेऊन असलेल्या दारव्हा रोड स्थित स्ट्राँग रुममध्ये (शासकीय गोदाम) जामर लावण्याची मागणी केली होती. हे ईव्हीएम कोणत्याही नेटवर्कमध्ये आल्यास हॅक होण्याची भीती व्यक्त करण्यात आली होती. मात्र जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जामर लावण्याचा चेंडू आयोगाकडे टोलविला.आधी हॅक होण्याची भीती, आता व्हीव्हीपॅट तपासणीची मागणी पाहता ही काँग्रेसची सावधगिरी की पराभवाची चाहूल असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
Lok Sabha Election 2019; २५ टक्के व्हीव्हीपॅट तपासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 9:39 PM
लोकसभेच्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघात किमान २५ टक्के व्हीव्हीपॅटची तपासणी व त्यातील चिठ्ठ्यांची मतमोजणी करावी, अशी आग्रही मागणी काँग्रेसने निवडणूक विभागाकडे केली आहे. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात ११ एप्रिल रोजी मतदान पार पडले.
ठळक मुद्देकाँग्रेसचा आग्रह : यवतमाळ-वाशिम लोकसभा