विलास गावंडे ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने सामूहिक विवाह मेळाव्याला प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. जिल्ह्यात पुढील पाच दिवसात होणारे ५०० शुभमंगल लांबणीवर पडले आहे. अगदी काही दिवसाआधी मिळालेल्या निरोपामुळे वधू आणि वर मंडळींपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.बळीराजा चेतना अभियानाअंतर्गत शेतकरी कुटुंबासाठी सामूहिक विवाह मेळावा योजना राबविली जात आहे. सामाजिक संस्थेच्या माध्यमातून मेळाव्यात विवाह करण्यासाठी नोंदणी करण्यात आली. विविध संस्थांकडे ५०० शुभमंगल नोंदले गेले. या संस्थांनी काही महिन्यांपूर्वीच नोंदणी झालेल्या जोडप्यांची माहिती प्रशासनाला दिली. यानुसार मेळाव्याची तारीख निश्चित करण्यात आली.ठरलेल्या तारखेनुसार वधू-वरांकडील मंडळींनी पत्रिका छापल्या, विविध माध्यमातून निमंत्रण दिले. सर्व तयारी झालेली असतानाच मेळावा होणार नाही, असा निरोप या मंडळींना गेला. आयोजक संस्थांचीही धावपळ सुरू झाली. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने सामूहिक विवाह मेळाव्याला परवानगी नाही, असे प्रशासनाने आयोजक संस्थांना कळविले. वास्तविक आचारसंहितेपूर्वीच आयोजनाचे सोपस्कार पूर्ण करण्यात आले होते.चेतना अभियानाची समाप्तीबळीराजा चेतना अभियानाची मुदत ३१ मार्चपर्यंत आहे. यानंतर या अभियानाला फुलस्टॉप मिळणार आहे. सामूहिक विवाह मेळावे याच अभियाना अंतर्गत शेतकऱ्यांसाठी घेतले जात आहे. आता मेळावेच रद्द झाले आहे. अभियानही संपत आहे. त्यामुळे शेतकरी पिता आणि आयोजक संस्थेला अनुदानाला मुकावे लागणार आहे. आचारसंहिता संपेपर्यंत चेतना अभियानाला मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी होत आहे.वधुपित्याच्या खात्यात १५ हजारसामूहिक विवाह मेळाव्यात शुभमंगल केल्यास वधूपित्याच्या खात्यात १५ हजार रुपये जमा केले जाते. शिवाय संस्थेला दिल्या जाणाऱ्या १५ हजार रुपयातून वधूला मंगळसूत्र, संसारोपयोगी भांडी, वधू-वरास कपडे दिले जाते.
Lok Sabha Election 2019; शेतकरी कन्येच्या लग्नाला ‘आचारसंहिता’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 9:37 PM
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने सामूहिक विवाह मेळाव्याला प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. जिल्ह्यात पुढील पाच दिवसात होणारे ५०० शुभमंगल लांबणीवर पडले आहे.
ठळक मुद्दे५०० कुटुंबापुढे प्रश्न : सामूहिक मेळाव्याला परवानगी नाकारली