शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
2
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
4
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
5
सीबीआयने अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले, घरात धाड टाकली, रोकडचा डोंगर सापडला
6
चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होईल आणि भारतही येईल, आता कमीपणा नाही; PCB अध्यक्षांची प्रतिक्रिया
7
'आम्ही भारताला फक्त शस्त्र विकत नाही, आमचं नातं विश्वासावर टिकून आहे', पुतिन स्पष्ट बोलले
8
Athiya Shetty-K L Rahul: अथिया शेट्टीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर एका वर्षातच पाळणा हलणार; शेअर केली पोस्ट
9
सरन्यायाधीशांचा आज शेवटचा वर्किंग डे; सुप्रीम कोर्टात 'असं' काय घडलं, सगळेच हसले
10
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
11
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."
12
आवडत्या जागी फिल्डिंग न दिल्याने रुसून बसला; मग 'मुंबई इंडियन्स'च्या माजी खेळाडूला संघाने 'बसवला'
13
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
14
सीएम सुक्खूंना मागविलेले समोसे सुरक्षा रक्षकांना वाटले गेले; CID चौकशी लावली, रिपोर्ट आला...
15
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
16
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
17
मनीषा कोईरालाने 'हीरामंडी 2' बद्दल दिलं अपडेट, दुय्यम भूमिका करण्याविषयी म्हणाली...
18
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
19
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
20
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण

Lok Sabha Election 2019; जिल्ह्यात निम्मे मतदार तरूण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2019 9:42 PM

जिल्ह्यात तब्बल निम्मे मतदार तरूण आहे. त्यांचे वय ४० वर्षांच्या आत आहे. विशेष म्हणजे वयाची ८० वर्षे पूर्ण केलेले ७१ हजार मतदार असून तीन मतदारांनी १०० व्या वर्षांत पदार्पण केले आहे.

ठळक मुद्दे४० च्या आत ११ लाख मतदार : ८० वर्षांचे तब्बल ७१ हजार मतदार७० ते ७९ वर्षे वयोगट १,१८, ९१८ मतदारशंभरी पार केलेले जिल्ह्यात केवळ ३ मतदार

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात तब्बल निम्मे मतदार तरूण आहे. त्यांचे वय ४० वर्षांच्या आत आहे. विशेष म्हणजे वयाची ८० वर्षे पूर्ण केलेले ७१ हजार मतदार असून तीन मतदारांनी १०० व्या वर्षांत पदार्पण केले आहे.जिल्ह्यात एकूण २० लाख ३८ हजार ५१४ मतदार आहेत. यातील निम्मे मतदार ४० वर्षांच्या आत आहेत. त्याची संख्या तब्बल ११ लाख ६३ हजार ४८९ आहे. विशेष म्हणजे वयाची शंभरी पार करणारेही जिल्ह्यात तीन मतदार आहे. तसेच ८० वर्ष पूर्ण करणारे तब्बल ७१ हजार ३० मतदार आहेत.वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्यांना मतदार यादीत आपले नाव समाविष्ट करण्याची संधी निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिली होती. त्याचा नवमतदारांनी लाभ घेतला. प्रत्येक राजकीय पक्ष तरूण मतदारांच्या मताधिक्याचा विचार करून आडाखे बांधत होते. नवमतदारांवर त्यांची सर्वाधिक भिस्त होती. मात्र जिल्ह्याची स्थिती फिप्टी-फिप्टी असल्याचे दिसते. तरूण मतदारांएवढीच संख्या उर्वरित मतदारांची आहे. यामुळे आता या मतदारांना बाजूला सारून विचार करणे कठीण झाले आहे. विशेष म्हणजे तरुणांपेक्षा याच मतदारांच्या मतदानाची टक्केवारी जादा आहे. तथापि उन्हामुळे वयोवृद्ध मतदार मतदानासाठी बाहेर पडणार किंवा नाही, याबाबत साशंकता आहे.वयोवृद्धांना थेट मतदान केंद्रात एन्ट्रीयावर्षी मतदारांसाठी निवडणूक आयोगाने विशेष खबरदारी घेतली आहे. वयोवृद्ध मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून त्यांना थेट मतदान केंद्रात एन्ट्री दिली जाणार आहे. त्यांच्यासाठी व्हील चेअर, मदतीसाठी मदतनीस दिला जाणार आहे. निवडणूक आयोगाने प्रथमच ज्येष्ठांचा खऱ्या अर्थाने आदर केला आहे.

टॅग्स :Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019yavatmal-washim-pcयवतमाळ-वाशिम