शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

Lok Sabha Election 2019; शिवसेनेला रस्त्यावरचे वैर धोकादायक काँग्रेसला सामाजिक तणावाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2019 9:32 PM

लोकसभा निवडणूक अंतिम टप्प्यात आली आहे. त्यानंतरही निवडणुकीत रंगत दिसत नाही. त्यामुळे स्थानिक समीकरणाचाच प्रभाव लोकसभेच्या मतदानावर राहण्याची दाट शक्यता आहे. यामुळे पक्षीय उमेदवारांना स्थानिक राजकीय समीकरणाचा फटका अथवा फायदा होण्याची प्रत्येक शहरातील स्थिती वेगवेगळी आहे.

ठळक मुद्देनगरसेवकांची भूमिका निर्णायक : सामाजिक संवेदनशील शहरात फिरु शकतो निकालयवतमाळ, कारंजा, पुसद ठरू शकतात निर्णायक

सुरेंद्र राऊत।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : लोकसभा निवडणूक अंतिम टप्प्यात आली आहे. त्यानंतरही निवडणुकीत रंगत दिसत नाही. त्यामुळे स्थानिक समीकरणाचाच प्रभाव लोकसभेच्या मतदानावर राहण्याची दाट शक्यता आहे. यामुळे पक्षीय उमेदवारांना स्थानिक राजकीय समीकरणाचा फटका अथवा फायदा होण्याची प्रत्येक शहरातील स्थिती वेगवेगळी आहे.यवतमाळ-वाशिम लोकसभा क्षेत्रात सर्वाधिक मतदान हे यवतमाळ विधानसभेत आहेत. येथील तीन लाख ६३ हजार ६३८ मतदारांपैकी ७० टक्के मतदार एकट्या यवतमाळ शहरात आहे. यवतमाळातील पालिकेच्या राजकारणात शिवसेना-भाजप एकमेकांचे कट्टर विरोधक आहेत. या वैराचा फटका शिवसेना उमेदवाराला बसण्याची शक्यता आहे. दुसऱ्या क्रमांकाची मतदारसंख्या वाशिम मतदारसंघात आहे. तेथे तीन लाख ४० हजार ८०२ मतदार आहेत. यातील ६० टक्के मतदार वाशिम शहरात आहे. या ठिकाणी सामाजिक समीकरणांचा फटका बसण्याची शक्यता आहे. येथेही सेना-भाजप कार्यकर्त्यांमध्ये अगदी रस्त्यावरचे वैर आहे. मतदान काढताना याचा प्रभाव पडल्यास युतीच्या उमेदवाराला मायनस करू शकतो. कारंजा शहरात विधानसभेतील ४० टक्के मतदार आहेत. सामाजिक दृष्ट्या संवेदनशील शहर असून त्याचा प्रभाव राहणार आहे. एका गटाकडे किंवा समाजाकडे गेल्यास दुसरा गट व समाज उमेदवारापासून दूर होतो. याचा फटका आघाडीतील उमेदवाराला बसण्याची चिन्हे आहेत. दिग्रस शहरात आघाडीच्या उमेदवाराला अल्पसंख्यक घटकातून अपेक्षित मदत मिळण्याची चिन्हे नाहीत. उलट दिग्रस व दारव्हा येथे काही प्रमाणात सहानुभूतीची लाट तयार होत आहे. राळेगाव व कळंब या दोन तालुक्यांमध्ये प्रहार जनशक्ती पक्षाच्या शेतकरी विधवेबद्दल वेगळे वातावरण तयार होत आहे. त्यामुळे युती व आघाडीच्या उमेदवाराला येथे चांगला संघर्ष करावा लागण्याची शक्यता आहे. पुसदमध्ये ‘नाईक पॅटर्न’ किती यशस्वी होतो यावर आघाडीचे भवितव्य आहे. येथे समाज म्हणून मतदान झाल्यास अपक्षाला ताकद मिळण्याची चिन्हे आहेत.युती, आघाडीपुढे प्रहार, वंचित, भाजप बंडखोराचे आव्हानशिवसेनेच्या भावना गवळी पाचव्यांदा रिंगणात आहेत. त्यांना यापूर्वी २००९ व २०१४ मध्ये राळेगाव विधानसभेतून भक्कम आघाडी मिळाली होती. दिग्रस विधानसभेतही युतीचे गणित जुळले होते. या निवडणुकीत परिस्थिती बदलली असून येथे ग्राफ खाली येण्याची भीती आहे.आघाडीचे माणिकराव ठाकरे यांच्या मुलाला २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत चौथ्या क्रमांकाची मते मिळाली होती. आता विभाजनाचा फटका यवतमाळ शहरात कमी होण्याची चिन्हे आहेत. तसेच भाजप-शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमधील वैराचा फायदा होऊ शकतो.प्रहार की अपक्ष प्रहार जनशक्तीच्या शेतकरी विधवा आणि समाज आणि धनशक्तीसह युतीतील नेत्यांचा छुपा पाठिंबा यावर अपक्ष उमेदवार आपला क्रमांक वाढविण्यासाठी लढत देऊ शकतो. यांना ग्रामीण मतदारांची साथ लाभण्याची स्थिती आहे. या दोनही उमेदवारांकडून प्रचार मोहीम जोरात राबविली जात आहे. यासाठी विविध माध्यमे वापरण्यात येत आहे.2009राळेगाव, यवतमाळ, दिग्रस, वाशिम या चार मतदारसंघातून शिवसेनेला भक्कम लिड मिळाली होती.2014पुसद वगळता मोदी लाटेत राळेगाव, कारंजा, वाशिम, यवतमाळ येथे सेनेचा लिड वाढला होता.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकyavatmal-washim-pcयवतमाळ-वाशिम