शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
2
आजचे राशीभविष्य : शुक्रवार 1 नोव्हेंबर 2024; आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
4
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
5
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
6
मनोज जरांगेंचे ‘एमएमडी’ समीकरण; विधानसभा लढवण्याची घोषणा
7
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
8
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
9
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल
10
पाकिस्तानसह जगभर दिवाळीची धूम, अमेरिकेत शाळांना सुट्टी
11
राज्यात आलेली सर्वाधिक परकीय गुंतवणूक फडणवीसांच्या नावावर
12
आयपीएल रिटेंशन : रोहित शर्मा मुंबईकडेच; माही केवळ ४ कोटींमध्ये खेळणार
13
समतोल ‘मन’ हेही ‘धन’; आज त्याची पूजा करू या!
14
मध्य रेल्वेने प्रवाशांना धरले वेठीस; ४ दिवस सुटीचे वेळापत्रक लागू
15
19 मिनिटांत 22 किलोमीटरचे अंतर पार अन् मिळाले जीवदान
16
खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी छोटा राजन टोळीचे ५ जण अटकेत
17
इस्रायली महिला फायटर्सचे इराणवर हल्ले!
18
११ वर्षीय पीडितेच्या गर्भपातास परवानगी; रक्त नमुना, टिश्यू जतन करण्याचे निर्देश 
19
‘राज’ की बात, भाजप अन् शिंदेंची अडचण!
20
दिवाळी, छटपूजेनिमित्त मध्य रेल्वेच्या ५८३ गाड्या

Lok Sabha Election 2019; भाजप बंडखोर, वंचित, प्रहारचा युतीलाच धोका अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2019 8:34 PM

भाजपचे बंडखोर, बसपा, प्रहार, वंचित आघाडी व अपक्ष उमेदवारांमुळे युतीच्या उमेदवारांनाच अधिक धोका आहे, असे मत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार माणिकराव ठाकरे यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देकाँग्रेसमध्ये गटबाजी नाही, तिकिट मागणे हा सर्वांचा हक्क

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्यामुळे मतदारसंघात काँग्रेस संस्कृतीशी एकरूप असलेले मतदार आहेत. ती काँग्रेसची पारंपरिक मते आहेत. येथील जनता जातीपेक्षा विचाराला मतदान करते. त्यामुळे भाजपचे बंडखोर, बसपा, प्रहार, वंचित आघाडी व अपक्ष उमेदवारांमुळे युतीच्या उमेदवारांनाच अधिक धोका आहे, असे मत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार माणिकराव ठाकरे यांनी व्यक्त केले.यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघात सध्या सर्वच उमेदवारांमध्ये प्रचाराची चुरस निर्माण झाली आहे. याच धावपळीत ठाकरे यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत विविध मुद्द्यांवर विश्लेषण मांडले.राज्याच्या राजकारणात २५ वर्षे घालवूनही लोकसभेच्या तिकिटासाठी संघर्ष का करावा लागला, या प्रश्नावर माणिकराव ठाकरे म्हणाले, गेल्यावेळी राहुल ठाकरे यांना ऐनवेळी तिकिट नाकारण्यात आले. मला विधानपरिषदेचे तिकिट नाकारतानाच पक्षनेतृत्वाने लोकसभेची तयारी करण्यास सांगितले होते. त्यानुसार जुलैपासूनच मी तयारी सुरू केली. उमेदवारी मागण्याचा हक्क सर्वांनाच आहे. काँग्रेसच्या पद्धतीनुसार चार टप्प्यांवरून नावे पक्षश्रेष्ठींकडे जातात, त्यातूनच एक उमेदवार ठरतो. पण अनेक जणांनी उमेदवारी मागितली यात मला काही वावगे वाटत नाही.पक्षांतर्गत गटबाजीचा सामना करावा लागतोय का, या प्रश्नावर ठाकरे म्हणाले, आमच्या पक्षात गटबाजी एवढी तीव्र नाही. अनेकांनी उमेदवारी मागितली म्हणजे ते आपले विरोधक आहे, असा त्याचा अर्थ नाही. तिकीट मागणारे असे सर्वच जण प्रचाराला लागले आहेत.या लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचा एकही आमदार नसताना आपण कशाच्या बळावर लोकसभा जिंकण्याची आशा बाळगता, यावर ठाकरे म्हणाले, ही राष्ट्रीय निवडणूक आहे. यात धोरणात्मक निर्णय घेतले जातात. सलग चार वेळा निवडूण दिलेल्या सेनेच्या खासदारांचा लोकांना मिळालेला अनुभव वाईट आहे. त्यामुळे खाली कुणाची ताकद आहे, किती आमदार आहे, यापेक्षा लोकांची भावना काय आहे, हेच महत्त्वाचे आहे.काँग्रेसच्या सत्ताकाळात कोणते मोठे काम झाले की ज्या आधारावर तुम्ही मते मागणार आहात, या प्रश्नावर ठाकरे म्हणाले, जिल्ह्यातील सिंचन व्यवस्था शक्य तेवढी वाढविण्याचे आम्ही प्रयत्न केले. बेंबळा प्रकल्प, मध्यम, लघु प्रकल्प, पांदण रस्त्यांची योजना, वीज बिल माफी, पोलीस कर्मचाऱ्यांची पगारवाढ, त्यांना फुल्ल ड्रेस, आधुनिक ट्रेनिंग प्रणाली, सर्कल इन्स्पेक्टरचे पद रद्द करून डीवायएसपी, अ‍ॅडीशनल एसपीच्या पदांची निर्मीती, जिल्ह्यात ३२ केव्हीचे ११ वीज उपकेंद्र, क्षमता वाढ, पारस (अकोला) येथील वीजनिर्मिती प्रकल्पाचे पुनरूज्जीवन आदी कामे काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात झाली आहेत.खासदार निधी गेला तरी कुठे?शिवसेनेच्या भावना गवळी सलग चार वेळा खासदार आहेत. दरवर्षी २५ कोटी प्रमाणे किमान शंभर कोटी त्यांना खासदार फंड मिळाला. मात्र आज आम्ही एवढ्या गावात फिरताना कुठेही खासदार निधीतून झालेल्या कामाचा फलक दिसला नाही. मग खासदार निधीतील हा पैसा गेला कुठे? असा प्रश्न माणिकराव ठाकरे यांनी उपस्थित केला.वेगळा विदर्भ हाही जुमलाच२०१४ मध्ये भाजपने वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावर मते मागितली. मात्र आजपर्यंत वेगळा विदर्भ झाला नाही. २०१९ च्या निवडणुकीत तर विदर्भाचा मुद्दाही भाजपच्या प्रचारात दिसत नाही. त्यामुळे भाजपचे वेगळ्या विदर्भाचे आश्वासन ‘जुमला’ ठरले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकyavatmal-washim-pcयवतमाळ-वाशिमMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019