लोकमत न्यूज नेटवर्कवणी : येथे खासगी व्यापाऱ्यांकडून तूर उत्पादकांची अक्षरश: लूट होत असून पाच हजार ६७५ रूपये हमी भाव असताना व्यापाऱ्यांकडून केवळ चार हजार ५०० ते चार हजार ८२५ रूपये प्रति क्विंटल दराने तुरीची खरेदी केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. असे असताना अद्याप नाफेडकडून तूर खरेदीसाठी कोणत्याही हालचाली दिसत नसल्याने शेतकऱ्यांना नाईलाजाने खासगी व्यापाºयांना तूर विक्री करावी लागत आहे.यावर्षी पर्जन्यमान कमी झाल्याने शेती उत्पादनावर चांगलाच परिणाम झाला आहे. या परिसरात कापूस, सोयाबीन व तूर हे मुख्य पीक शेतकरी घेतात. मात्र अल्प पावसाचा या तिनही पिकांना चांगलाच फटका बसला. शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने तूर पिकाची लागवड केली. मात्र ५० टक्केपेक्षाही कमी उत्पादन झाले. त्यामुळे लागवडीचा खर्चही निघेनासा झाला आहे. अनेक शेतकऱ्यांची तूर काढणी झाली असून काही शेतकरी तूर काढणीत व्यस्त आहे. ज्यांची तूर काढणी झाली ते शेतकरी आर्थिक अडचणीत असल्याने आपली तूर खासगी व्यापाºयांकडे घेऊन जात आहेत.शेतकऱ्यांची गरज हेरून व्यापाऱ्यांनी अक्षरश: लूट सुरू केली आहे. शासनाने पाच हजार ६७५ रूपये हमी भाव जाहीर केला असला तरी अद्याप नाफेडद्वारा खरेदी सुरू केली नाही. विशेष म्हणजे मागीलवर्षी डिसेंबर महिन्यातच तूर खरेदी सुरू करण्यात आली होती. शेवटच्या दाण्यापर्यंत तूर खरेदी केली जाईल, असे आश्वासनदेखिल शासनाने दिले होते. मात्र ते आश्वासन हवेत विरले. नाफेडने मधेच तूर खरेदी बंद करून टाकली. परिणामी मागीलवर्षी अनेक शेतकऱ्यांना कमी भावात व्यापाऱ्यांना तूर विकावी लागली.यंदाही हीच परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांच्या घरात तुरीचे पीक आले असले तरी नाफेडद्वारा तूर खरेदीच्या कोणत्याच हालचाली नाही. अद्याप शासनाकडून तूर खरेदीबाबत कोणतेही परिपत्रक आले नसल्याचे खरेदी-विक्री संघाकडून सांगण्यात आले. त्यामुळे आणखी १५ दिवस तरी नाफेडद्वारा खरेदी सुरू होण्याची शक्यता नाही. शेतकरी आर्थिक संकटात असल्याने ते खासगी व्यापाºयांकडे तूर विकत आहे. अनेक शेतकºयांना नाफेडच्या खरेदीची प्रतीक्षा असल्याने त्यांनी तूर घरातच ठेवली आहे.धुक्याने बसला तूर पिकाला फटकाडिसेंबर महिन्यात अवकाळी पावााने थैमान घातले. त्यादरम्यान जवळपास चार दिवस धुक्याचा प्रकोप होता. त्यामुळे त्याचा फटका तूर पिकाला बसला. तुरीची झाडे मोठ्या प्रमाणावर वाळली. शेंगा ज्या प्रमाणात भरायला हव्यात, त्या भरल्या नाहीत. त्यामुळे उत्पादनात मोठी घट झाली.रानडुकरांचा धुमाकूळ सुरूचअनेक शेतकऱ्यांनी तुरीची कापणी करून शेतात ठेवली आहे. रात्रीच्यावेळी मात्र रानडुकरांचे कळप कापलेल्या तुरीवर ताव मारत आहेत. यामुळेही मोठे नुकसान होत आहे. डुकरांचा उपद्रव थांबविण्यासाठी शेतकऱ्यांकडून वेगवेगळे प्रयोग केले जात असले तरी त्यालाही ते जुमानत नसल्याने शेतकऱ्यांचा वैताग वाढला आहे.
वणीत व्यापाऱ्यांकडून तूर उत्पादकांची लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 10:21 PM
येथे खासगी व्यापाऱ्यांकडून तूर उत्पादकांची अक्षरश: लूट होत असून पाच हजार ६७५ रूपये हमी भाव असताना व्यापाऱ्यांकडून केवळ चार हजार ५०० ते चार हजार ८२५ रूपये प्रति क्विंटल दराने तुरीची खरेदी केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.
ठळक मुद्देकमी भावाने खरेदी : उत्पादन ५० टक्क्यांनी घटले, शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान