भरदिवसाची घटना : चोरटे झाले सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैदपुसद : पोलीस असल्याची बतावणी करून बँक कर्मचाऱ्यास एक लाख रुपयाने लुटल्याची घटना बुधवारी दिवसाढवळ््या नगीना चौकात घडली. येथील राजराजेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेचे कर्मचारी संदीप रामराव भवर हे यवतमाळ अर्बन बँकेतून तीन लाख रुपयांची रक्कम काढून पतसंस्थेकडे जात होते. यावेळी त्यांच्यावर पाळत ठेऊन असलेल्या भामट्यांनी नगिना चौकात त्यांना रोखले. आम्ही पोलीस आहोत, अशी बतावणी करून तुझी बॅग पहायची आहे, असे म्हटले. यावेळी भवर यांचे काही एक ऐकुण न घेता त्यांच्या बॅगची झडती घेणे सुरू केले. एकाने संदीप भवर यांना बोलण्यात गुंतविले तर दुसऱ्याने चलाखीने पैसे उडविले. जेव्हा संदीप भवर पतसंस्थेत पोहोचले तेव्हा पैसे मोजले असता एक लाख रुपये कमी असल्याचे त्यांना लक्षात आले. त्यांनी त्वरित शाखा व्यवस्थापकांना ही माहिती दिली. पोलिसातही तक्रार दिली.सीसीटीव्हीमध्ये भामट्यांचे चित्र कैद झाल्याने ते पकडले जाण्याची शक्यता आहे. (तालुका प्रतिनिधी)
तोतया पोलिसांनी पुसदच्या बँक कर्मचाऱ्याला एक लाखाने लुटले
By admin | Published: December 25, 2015 3:26 AM