रूपेश उत्तरवारयवतमाळ : लम्पी चर्मरोगाचा प्रसार झपाट्याने होत आहे. या रोगाने देशभरात ८२ हजार पशुधनाचा मृत्यू झाला. महाराष्ट्रातील १८७ पशुधनाचा त्यात समावेश आहे. या आजाराला रोखण्यासाठी उपयुक्त औषधी खरेदी करताना कुठल्याही अडचणी येऊ नयेत म्हणून प्रत्येक जिल्ह्याला एक कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
बाधित क्षेत्रातील पाच किलोमीटर अंतरात जलदगतीने लसीकरण करण्याच्या सूचना आहेत. यानुसार पशुसंवर्धन विभागाने अतिशय वेगाने लसीकरणाला सुरुवात केली आहे. यात शासकीय पशुवैद्यक, खासगी पशुुवैद्यक, आंतरवासिता छात्र आदींना मदतीला घेण्यात आले आहे. राज्यात २,७३० जनावरे आजारातून बरी झाली आहेत. उपचारासाठी ४८ लाख लसीचे डोस उपलब्ध केले आहेत. आतापर्यंत १७ लाख जनावरांचे लसीकरण करण्यात आले आहे. दर दिवसाला एक लाख लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
मोफत औषधोपचार आणि लसीकरणलम्पी आजारासंदर्भात शासनाकडून मोफत लसीकरण करण्यात येत आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हा नियोजन समितीमार्फत एक कोटीचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या आजाराचा मानवाला धोका नाही. परंतु पशुपालकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.- सचिंद्र प्रताप सिंह, आयुक्त, पशुसंवर्धन, पुणे
देशातील बळीराजस्थान - ५३,०६४ । पंजाब - १७,३१९ । गुजरात - ५,५५४हिमाचल प्रदेश - ३,२०९ । हरयाणा - २७५
nजळगाव - ६४nअहमदनगर - २४nधुळे - ७nअकोला - २८nपुणे - १७nलातूर - ३nसातारा - ९nबुलडाणा - १०nअमरावती - १३nकोल्हापूर - ७nसांगली - १nवाशिम - १nजालना - १nठाणे - १ nनागपूर - १
(यवतमाळ, जळगाव, अहमदनगर, धुळे, अकोला, पुणे, लातूर, औरंगाबाद, बीड, सातारा, बुलडाणा, अमरावती, उस्मानाबाद, कोल्हापूर, सांगली, परभणी, सोलापूर, वाशिम, नाशिक, जालना, पालघर, ठाणे, नांदेड, नागपूर आणि चंद्रपूर)