शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
3
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
4
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
5
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
6
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
7
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
8
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
9
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
13
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
14
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
15
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
16
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
17
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
18
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 

गुप्तधनाचा हव्यास; नरबळीसाठी बापानेच खोदला खड्डा; मुलीने 'असा' वाचवला स्वत:चा जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2022 10:11 AM

मुलीच्या वडिलानेही गुप्तधनाच्या हव्यासाने नरबळी देण्याची तयारी दाखविली आणि त्यानंतर लगेच घराच्या मागच्या खोलीत खड्डा खोदून पूजा मांडण्यात आली.

ठळक मुद्देमुलीनेच व्हिडिओ पाठवून हाणून पाडला डावमांत्रिकासह नऊ जण गजाआड

बाभूळगाव (यवतमाळ) : गुप्तधनाच्या हव्यासापोटी पोटच्या मुलीचा नरबळी देण्याची तयारी खुद्द बापानेच केली होती. यासाठी मध्यरात्री खड्डा खोदून पूजाही मांडण्यात आली. मात्र, तेवढ्यात घटनास्थळी पोलीस धडकले आणि आरोपी वडील, मांत्रिकासह नऊ जणांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. हा धक्कादायक प्रकार बाभूळगाव तालुक्यातील मादणी येथे सोमवारी मध्यरात्री घडला.

मादणी येथील राहत्या घराच्या मागच्या खोलीत गुप्तधन असल्याची चर्चा नेहमी केली जात होती. यातूनच त्या व्यक्तीने मांत्रिकाला पाचारण केले. मांत्रिकाने घराच्या मागच्या खोलीची पाहणी केली आणि गुप्तधन आहे, मात्र ते काढण्यासाठी नरबळी द्यावा लागेल, असे मुलीच्या बापास सांगितले. मुलीच्या वडिलानेही गुप्तधनाच्या हव्यासाने नरबळी देण्याची तयारी दाखविली आणि त्यानंतर लगेच घराच्या मागच्या खोलीत खड्डा खोदून पूजा मांडण्यात आली.

ज्या मुलीला नरबळी द्यायचे होते, ती मुलगी मांत्रिक आणि वडिलांचे बोलणे बाजूच्या खोलीच्या दाराच्या फटीतून ऐकत होती. नरबळीचे नाव निघाल्यानंतर आणि त्यात माझाच बळी द्यायची चर्चा सुरू आहे, हे ऐकल्यानंतर ही मुलगी गर्भगळीत झाली. तिने तातडीने आपल्या मोबाईलमधून वडील आणि मांत्रिकात सुरू असलेल्या चर्चेचा व्हिडिओ शूट केला तसेच खोदलेला खड्डा आणि मांडलेल्या पूजेचे फोटो काढले आणि हा व्हिडिओ आणि फोटो तिने यवतमाळ येथील आपल्या मित्राला पाठविला.

यवतमाळ पोलिसांनी या प्रकाराची माहिती तातडीने बाभूळगाव पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी मादणी येथे धाव घेऊन मांत्रिक आणि प्रमुख आराेपी मुलीच्या वडिलाचे मनसुबे उधळून लावले. यावेळी पूजेचे साहित्य, टोपले, फावडे, फुलांचा हार, आदी साहित्य घटनास्थळावरून जप्त करण्यात आले. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक मंगेश डांगे, जमादार अशोक गायकी, जमादार दिगंबर अलामे, सागर बेलसरे, गणेश शिंदे, आदींनी पार पाडली. उपविभागीय पोलीस अधिकारी संपतराव भोसले, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी, पोलीस निरीक्षक रवींद्र जेधे यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली.

मांत्रिकासह नऊजणांची कोठडीत रवानगी

या प्रकरणात राजकुमार जयंत धकाते, विजय शेषराव बावणे, रमेश कवडूजी गुंडेकार, वाल्मिक रमेश वानखडे, विनोद नारायण चुनारकर, दीपक महादेवराव श्रीरामे, आकाश शत्रुघ्न धनकसार या सात आरोपींसह राळेगाव येथील दोन महिलांवर गुन्हे दाखल करून भादंवि कलम ३७६, ३५४, ३०७, ३२३, ५०६, ३४, बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा, पॉक्सो तसेच महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा, जादूटोणा प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या सर्व आरोपींना मंगळवारी यवतमाळ न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणाचा तपास ठाणेदार रवींद्र जेधे करीत आहेत.

अवघ्या २० मिनिटांत पोहोचले पोलीस

पीडित मुलीने मांत्रिक आणि वडिलांमधील संभाषणाचा व्हिडिओ तसेच फोटो यवतमाळमधील आपल्या मित्राला पाठविला. या मित्रानेही घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ यवतमाळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी बाभूळगाव ठाण्याला या प्रकाराबाबत संदेश दिल्यानंतर अवघ्या २० मिनिटांत पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी दाखविलेल्या या तत्परतेमुळेच घटनास्थळावरून नऊ आरोपींना ताब्यात घेण्यात यश आले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीyavatmal-acयवतमाळMONEYपैसा